“4 जूननंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेलमध्ये जाणार”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | लोकसभा निवडणुकीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. दोन्ही युतीमधील नेते प्रचार सभामध्ये तर हल्लाबोल करतच आहेत, शिवाय व्यक्तीगत देखील टीका करत आहेत. अशात मविआ नेते तथा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना जेल होणार, असा दावा केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राऊत असं नेमकं का म्हणाले?, याबाबत आता वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

4 जूनपर्यंत शिंदे यांना काय तांडव करायचा आहे ते करू देत. शिंदेंनी भ्रष्टाचारावर बोलावं, स्वतःच्या भ्रष्टाचारामुळे ते गळपटले होते. आता 4 जूननंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील, असा दावाच संजय राऊत यांनी केला आहे.

यावेळी राऊत यांनी पंतप्रधान एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. भाजपमध्ये खोटे कोण बोलू शकते हे एकमेव क्वालीफिकेशन लागते. त्यात अजित पवारांना खोटे बोलण्याची सवयच लागली आहे, असा घणाघात राऊतांनी केला.

पंतप्रधान मोदी यांच्याबाबत राऊत म्हणाले की, मोदींची तब्येत ठीक नसून त्यांची गाडी रूळावरून घसरलेली आहे. मोदींनी एकाही सभेत काम केल्याचा आढावा दिला नाही, अशी टीका राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी यांच्यावर केली.

“शिवसेना कधीच विलीन होणार नाही”

दरम्यान, शरद पवार यांच्या पक्ष विलीनीकरणबाबतही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना कधीच विसर्जीत होणार नाही, किंवा विलनीकरण होणार नाही. आम्ही आमचा पक्ष अनेक संकटात टिकवून ठेवला, बाळासाहेब ठाकरे असतानाही अनेक नेते सोडून गेले. जुने जातात नवे येतात. आमच्याकडे आत्मविश्वास आहे, लोकांचा विश्वास असल्याचं राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

News Title –  Sanjay Raut big claim about Eknath Shinde

महत्त्वाच्या बातम्या-

संजोग वाघेरे यांना घरातूनच विरोध!, भावकीतील संदीप वाघेरे यांनी दिली तिखट प्रतिक्रिया

‘दीपिका प्रेग्नंट आहे तरी बेबी बंप का दिसेना?’; चाहत्यांना सतावतेय चिंता

कर्जवाटपासंदर्भात आरबीआयने नियम बदलले; जाणून घ्या नवीन नियम

तुमच्या मुलीच्या लग्नासाठी महिन्याला 1000 रुपये गुंतवा; लग्नाचा खर्च आरामात निघेल

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कमी किंमतीत खरेदी करा ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर