संजोग वाघेरे यांना घरातूनच विरोध!, भावकीतील संदीप वाघेरे यांनी दिली तिखट प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maval Lok Sabha | बारामती मतदारसंघानंतर आता राज्यात मावळ लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे.मावळ मतदारसंघ आणि पिंपरी-चिंचवड येथे नातेसंबंधाचा नेहमीच दबदबा राहिला आहे. अशात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना त्यांच्याच नातेवाईकांनी विरोध केल्याने राजकीय वर्तुळात सध्या याचीच चर्चा रंगली आहे.

संजोग वाघेरे यांना भावकीमधील संदीप वाघेरे विरोध केलाय. संदीप वाघेरे हे भाजपचे नगरसेवक असून त्यांनी आपल्याच नातेवाईक असलेल्या मविआचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यावर टीका केली आहे.

संदीप वाघेरे यांनी सगळंच काढलं

पिंपरी गावातील मूलभूत प्रश्न सोडविता आले नाही आणि आता त्यांना मावळचे खासदार होण्याचे डोहाळे लागले आहेत, असा टोला संदीप वाघेरे यांनी लगावला आहे. महायुतीच्या कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात संदीप वाघेरे यांनी संजोग वाघेरे यांच्यावर निशाणा साधला.

गेल्या पंधरा-वीस वर्षांत पिंपरी गावात विकासाचा अ देखील दिसला (Maval Lok Sabha) नसल्याचं यावेळी संदीप वाघेरे यांनी पटवून दिलं. पुढे त्यांनी संजोग वाघेरे यांच्यावर धक्कादायक आरोप देखील केले. त्यामुळे संदीप वाघेरे हे आता चर्चेत आले आहेत.

“गेल्या पंधरा वर्षांत पिंपरीमध्ये विकास केला नाही, आता..”

महापालिकेमध्ये ठेकेदारी करून स्वतःचे घर भरले, त्यांना आता याच पद्धतीने खासदार बनून घर भरायचे आहे काय?, आता कशाला खासदार व्हायचंय?, असा संतप्त सवाल संदीप वाघेरे यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर थेट परिवार वाद काढत संदीप वाघेरे यांनी संजोग वाघेरे यांच्यावर हल्लाबोल केला.

संजोग वाघेरे यांच्या कुटुंबात कायमच सत्ताधारी राष्ट्र‌वादी काँग्रेस पक्षाच्यावतीने वेळोवेळी अनेक पद होती. त्यांचे दिवंगत वडील भिकू वाघेरे पाटील हे महापौर होते. त्याचबरोबर संजोग वाघेरे यांनीदेखील महापैरपद भूषविले आाहे. त्यानंतर त्यांच्या पत्नीदेखील स्थायी समिती सदस्या होत्या.एवढी मोठी पदे घरात असतानादेखील पिंपरी गावाला (Maval Lok Sabha) जुन्या पुणे-मुंबई महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रेल्वे लाईनवरील उड्डाणपूल संजोग वाघेरे यांना बांधता आला नाही. अशी टीका संदीप वाघेरे यांनी केली आहे.

News Title –  Maval Lok Sabha sandeep waghere on sanjog waghere

महत्त्वाच्या बातम्या-

‘दीपिका प्रेग्नंट आहे तरी बेबी बंप का दिसेना?’; चाहत्यांना सतावतेय चिंता

कर्जवाटपासंदर्भात आरबीआयने नियम बदलले; जाणून घ्या नवीन नियम

तुमच्या मुलीच्या लग्नासाठी महिन्याला 1000 रुपये गुंतवा; लग्नाचा खर्च आरामात निघेल

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कमी किंमतीत खरेदी करा ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाचं निधन; संपूर्ण बॉलीवुडमध्ये शोककळा