अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कमी किंमतीत खरेदी करा ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Electric Scooter l उद्या साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आहे. या दिवशी वाहन, सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अशातच आता iVoomi कंपनीने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. iVoomi कंपनीने भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. JeetX ZE असे या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव आहे.

नवीन ई-स्कूटर 8 रंगांमध्ये उपलब्ध :

कंपनीने JeetX ZE ही स्कुटर भारतीय बाजारपेठेत तीन बॅटरी पॅक आकारात लाँच केली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जिंगमध्ये 170 किलोमीटरची रेंज देत आहे. iVoomi JeetX चे बुकिंग 10 मे पासून म्हणजेच सुरु होत आहे. या स्कूटरच्या डिलिव्हरी तारखेबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पण, या इलेक्ट्रिक स्कूटरच्या लाँचमुळे लोकांसाठी बजेट-फ्रेंडली ई-स्कूटरचा आणखी एक पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे.

iVoomi JeetX ZE ही इलेक्ट्रिक स्कुटर आठ रंगांमध्ये बाजारात लाँच झाली आहे. या आठ कलर व्हेरियंटमध्ये नार्डो ग्रे, इम्पीरियल रेड, अर्बन ग्रीन, पर्ल रोज, प्रीमियम गोल्ड, सेरुलियन ब्लू, मॉर्निंग सिल्व्हर आणि शॅडो ब्राउन यांचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहक आवडीनुसार कोणत्याही कलर व्हेरियंटमध्ये ई-स्कूटर खरेदी करू शकतात. ही स्कूटर 1,350 मिमीच्या व्हील बेससह येत आहे. या ई-स्कूटरची लांबी 760 मिमी आणि सीटची उंची 770 मिमी आहे, ज्यामुळे प्रत्येकजण ही स्कूटर सहजपणे चालवू शकेल.

Electric Scooter l इलेक्ट्रिक स्कूटरची फीचर्स :

iVoomi ची इलेक्ट्रिक स्कूटर एका ॲप्लिकेशनसह येत आहे जी ब्लूटूथ उपकरणांसह कनेक्ट केली जाऊ शकते. याद्वारे टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सिस्टम, कॉल आणि एसएमएस अलर्ट देखील स्क्रीनवर पाहता येतील. iVoomi JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर तीन बॅटरी पॅक आकारांसह बाजारात आली आहे. यात 2.1 kWh, 2.5 kWh आणि 3 kWh चे तीन बॅटरी पॅक पर्याय आहेत. यामध्ये बसवलेली इलेक्ट्रिक मोटर 9.38 bhp ची कमाल पॉवर प्रदान करते. या स्कूटरचा बॅटरी पॅक मोटरपेक्षा 20 टक्के हलका आहे.

iVoomi JeetX ZE ही बजेटफ्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 79,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर 80 हजार रुपयांच्या रेंजमध्ये एक चांगला पर्याय ठरू शकते. ही स्कूटर सिंगल चार्जिंगमध्ये 170 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही स्कुटर घारेदी करण्याचं स्वप्न साकार करू शकतात.

News Title – iVoomi X ZE Launched in India

महत्त्वाच्या बातम्या-

नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल; उद्धव ठाकरे कोणावर भडकले?

शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! तब्बल ‘इतक्या’ दिवस अवकाळी पावसाचा इशारा

चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य ठरलं बारामतीत कमी मतदान पडण्याला कारणीभूत

पुण्याच्या निवडणुकीत मिठाचा खडा; निवडणुका आयोगाने उमेदवारांना पाठवल्या धडाधड नोटिसा

या राशीच्या व्यक्तींना मित्रमंडळींच्या मदतीने उत्पन्नाच्या संधी मिळतील