चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य ठरलं बारामतीत कमी मतदान पडण्याला कारणीभूत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Loksabha l लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदार संघांकडे संपूर्ण देशाचं लक्ष होत. या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण 11 मतदार संघात मतदान पार पडलं आहे. यामध्ये शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदार संघाची सर्वत्र चर्च होती. बारामती मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्यात चुरशीची लढत झाली आहे.

अजित पवारांनी मनातील खदखद बोलून दाखवली :

या लोकसभा निवडणुकीत यंदाच्या वर्षी बारामती लोकसभा मतदारसंघात 2019 च्या तुलनेत कमी मतदान झाल्याचं अहवालातून समोर आलं आहे. 2019 मध्ये बारामतीत 61.54 टक्के इतकं मतदान झाले होते, मात्र यावर्षी निवडणुकीत मतदानाचा टक्का 59.50 टक्के इतका झाला आहे. अहवालानुसार, या वर्षी मतदान दोन टक्क्यांनी घटलेले दिसत आहे. त्यामुळे हे मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यापार्श्वभूमीवर महायुतीमध्ये वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी अजित पवार म्हणाले कि, बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत मला कोणी विचारणा केली तर, चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये येऊन केलेल्या वक्तव्यामुळेच ही परिस्थिती झाल्याची तक्रार मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करणार आहे. पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Baramati Loksabha l चंद्रकांत पाटील बारामतीत नेमकं काय म्हणाले? :

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभा मतदार संघात निवडणुकीपूर्वी बैठक घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले की, या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीमधून संपविणार आहे. तसेच बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला कायमचे संपवायचे आहे. चंद्रकांतदादांच्या या वक्तव्याचे त्यावेळी तीव्र पडसाद देखील उमटले होते. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आज ही परिस्थिती ओढावल्याची खदखद अजित पवारांनी महायुतीच्या बैठकीत बोलवून दाखवली आहे.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यावेळी मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना ‘भटकती आत्मा’ असा टोला लगावला होता. मोदींच्या या वक्तव्याचा बारामतीमध्ये नकारात्मक परिणाम झाल्याची चर्चा रंगली आहे.

News Title – Chandrakant Patil statement in Baramati resulted in less votes

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्याच्या निवडणुकीत मिठाचा खडा; निवडणुका आयोगाने उमेदवारांना पाठवल्या धडाधड नोटिसा

या राशीच्या व्यक्तींना मित्रमंडळींच्या मदतीने उत्पन्नाच्या संधी मिळतील

“तेच आदित्य ठाकरे ज्यांच्या ज्यूस आणि नाश्त्याची सोय श्रीकांत शिंदे करायचे”

टी 20 विश्वचषकआधी पाकिस्तानातून धमकी; ‘त्या’ फोनने एकच खळबळ

कंगना म्हणते ‘बिग बी नंतर मलाच जास्त मान’, प्रसिद्ध अभिनेत्याला हसू आवरेना