Kangana Ranaut | देशामध्ये लोकसभा निवडणूक सुरू आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेश येथील मंडी लोकसभा मतदारसंघातून बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणौतला (Kangana Ranaut) तिकीट दिलं गेलं आहे. आपल्या मंडी लोकसभा मतदारसंघात प्रचार करताना दिसत आहे. तिच्या सभेला मोठी गर्दी होताना दिसत आहे. इतर लोकसभा मतदारसंघाप्रमाणे कंगनामुळे आता मंडी लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रचारसभेत, रॉलीत कंगना (Kangana Ranaut) उपस्थितांना संबोधित करत असते. मात्र ती बोलत असताना केवळ मंडीच नाहीतर संपूर्ण देशात तिने केलेल्या वक्तव्याची चर्चा होताना दिसतेय. एका सभेत बोलत असताना तिने आपली तुलना ही थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी केली. यावरून तिला ट्रोल देखील केलं जात आहे. अभिनेता कमल रशिद खान याने कंगनाला (Kangana Ranaut) थेट आता उर्फी जावेद आणि राखी सावंत यांच्या पंक्तीत नेऊन ठेवलं आहे.
केआरकेने कंगना राणौतचा (Kangana Ranaut) व्हिडीओ शेअर करत तिची खिल्ली उडवली आहे. कमल हा एक चित्रपट समीक्षक आहे. तो नेहमी बॉलिवूडमधील कलाकारांवर टीका करताना दिसत असतो. आता त्याने कंगनाची तुलना थेट उर्फी जावेद आणि राखी सावंतसोबत केली आहे.
कमल खानचं ट्विट चर्चेत
“कंगना दिदी निवडणूक लढवतेय. ती रोज वक्तव्य करते. तिचे वक्तव्य ऐकून हसू येतं. पण नुकतंच ती असं काही बोलली की मला हसू अनावर झालं, खळखळून हसलो. अमिताभ बच्चन यांच्यानंतर मिच असं म्हणाली. चुकीचं बोलली तू, असं कमल रशिद खान म्हणाला. त्यानंतर तो म्हणाला की, कंगना तु एक नंबरला आहेस. दोन नंबरला राखी सावंत तर तीन नंबरला उर्फी जावेद आहे,” असं कमल रशिद खान म्हणाले.
Kangana Deedi said that she is the most respected person in the Bollywood!🤪 pic.twitter.com/VXAi8jEQnf
— KRK (@kamaalrkhan) May 7, 2024
अमिताभ बच्चनजींशी केली तुलना
देश आश्चर्य आहे की या कंगनाला जिथे जाईल तिथे प्रेम मिळत आहे. जसे की ती राजस्थानला जावो, पश्चिम बंगालला जावो, दिल्लीत जावो की मणिपूरला. मी खात्रीने सांगते की अमिताभ बच्चन यांच्यानंतर इंडस्ट्रित कोणाला इतकं प्रेम मिळालं असेल ते मला मिळालं, असं कंगना म्हणाली.
कंगनाने आपली तुलना थेट अमिताभ बच्चन यांच्याशी केली आहे. तिला ट्रोल केलं जात असून तिची सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तिने केलेल्या या वक्तव्याचा परिणाम तिच्या मतदानावर होईल का?, असा सवाल आता उपस्थित होऊ शकतो.
News Title – Kangana Ranaut Statement About Herself Compare To Amitabh Bachchan
महत्त्वाच्या बातम्या
‘…तर मी मिशा ठेवणार नाही’; गुणरत्न सदावर्तेंनी दिलं आदित्य ठाकरेंना चॅलेंज
राज्यात 10 हजार कोटी रुपयांचा ॲम्बुलन्स घोटाळा?, हायकोर्टानं मागितला शिंदे सरकारकडं खुलासा
शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला उघडणार केदारनाथ धामचे द्वार
लंकेच्या प्रचारात नवा मुद्दा, गुजरातच्या हार्दिक पांड्याला मुंबईचा कॅप्टन केल्याने लोक नाराज!
“महालात जाऊन गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक राहणं चांगलं”