महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मान्सून दाखल होणार, पंजाब डख यांचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | महाराष्ट्रात सध्या उष्णतेनं नको केलं आहे. उन्हामुळे उष्मघाताचा अनेकांना त्रास होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत उन्हाळ्यामध्ये यंदा फारसा अवकाळी पाऊस पाहायला मिळाला नाही. यंदाच्या वर्षी मान्सूनची परिस्थिती कशी असेल. तसेच राज्यात मान्सून कधी हजेरी लावेल? याबाबत पंजाबराव डख हवामान अभ्यासकाने माहिती दिलीये. (Weather Update)

पंजाबराव डख यांनी यंदा म्हणजेच 2024 मध्ये देशात तसेच राज्यात कधी मान्सून दाखल होईल याबाबत मोठी अपडेट दिली आहे. यंदा समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

राज्यात समाधानकारक पाऊस होणार

यंदा उन्हाळ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत फारसा म्हणावा असा अवकाळी पाऊस झालेला नाही. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. यामुळे यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे. (Weather Update)

राज्यात ‘या’ तारखेला पावसाची शक्यता

डख यांनी अंदमान येथे 22 मे रोजी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या पावसाबाबत अपडेट दिली. राज्यात 12 ते 13 जूनमध्ये मान्सूनचा पाऊस होणार असल्याची माहिती दिली आहे. पेरणी योग्य पाऊस हा 22 जूननंतर होणार असल्याची शक्यता आहे. (Weather Update)

22 जूननंतर हवामान खात्याने पेरणी योग्य पाऊस होईल, असा इशारा दिला असून 25 ते 27 जून दरम्यान, राज्यात पेरणीला जोर धरला जाईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील शेवटच्या आठवड्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या या पूर्ण होतील, असा विश्वास पंजाबराव डख यांनी दिला होता.

यंदा जुलै महिन्यामध्ये पाऊस हा जोरदार होणार आहे. तर ऑगस्ट महिन्यात कमी प्रमाणात पाऊस असण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. 7 मे पासून ते 11 मे 2024 मध्ये राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पूर्व मौसमी पाऊस पाहायला मिळू शकतो, असा अंदाज  हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलाय.

News Title – Weather Update Maharashtra Punjabrao Dakh

महत्त्वाच्या बातम्या

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी!; ‘या’ तारखेला उघडणार केदारनाथ धामचे द्वार

लंकेच्या प्रचारात नवा मुद्दा, गुजरातच्या हार्दिक पांड्याला मुंबईचा कॅप्टन केल्याने लोक नाराज!

“महालात जाऊन गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक राहणं चांगलं”

सब पैसों का खेल है बाबू भैय्या! मुंबईत ऐन निवडणुकीच्या काळात 4 कोटी 70 लाख जप्त

शाॅरमा आवडीने खात असाल तर आत्ताच व्हा सावध; 19 वर्षीय तरुणाने गमावला जीव