शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला उघडणार केदारनाथ धामचे द्वार

Kedarnath Mandir | केदारनाथ धामच्या यात्रेला दरवर्षी हजारो-लाखों भाविक जात असतात. केदारनाथ धामचे दरवाजे कधी उघडणार आणि कधी आपण दर्शन घेणार, याची आस शिवभक्तांमध्ये लागलेली असते. यावर्षी देखील हजारोंच्या संख्येने भाविक यात्रेसाठी निघाले आहेत.

यंदा केदारनाथ धामचे दरवाजे 10 मे रोजी उघडणार आहे. दर्शनाची आस लावून बसलेल्या लाखो श्रद्धाळूंसाठी आणि पर्यटकांसाठी हा महत्त्वाचा क्षण असणार आहे. समितिकडून मंदिर परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे.

सोमवारी ओंकारेश्वर मंदिरात केदारपुरीचे रक्षक बाबा भैरवनाथ यांच्या पूजेने केदारनाथचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. बाबा केदार यांची पंचमुखी चाल-विग्रह उत्सव डोली सोमवारी विशेष पूजन करून निज धामकडे प्रस्थान झाली.या उत्सवासाठी तब्बल आठ क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट करण्यात आली.

10 मे ते 3 नोव्हेंबरपर्यंत केदारनाथ मंदिर खुलं

आता 9 मे रोजी ही डोली केदारनाथ धाममध्ये दाखल होईल आणि 10 मे रोही मंदिराचे द्वार खुले केले जाईल. केदारनाथ धामचे दरवाजे 10 मे रोजी सकाळी 7 वाजेपाासून उघडण्यात येतील. त्यानंतर केदारनाथ धाम भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं जाईल. 10 मे 2024 पासून 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत केदारनाथ मंदिर (Kedarnath Mandir ) दर्शनासाठी खुलं असेल.

बाबा केदारनाथ मंदिर धाम समितीकडून दर्शनासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत. येथे येणाऱ्या भाविकांची योग्य सोय केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. आता भक्तांना मंदिराचे द्वार खुले होण्याची प्रतिक्षा लागली आहे.

समितीकडून लागू करण्यात आलेले नियम

भाविकांसाठी कडक ड्रेसकोड  लागू करण्यात आला नाही. पण, मर्यादित कपडे घालण्याचं आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आलंय.
मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यावर निर्बंध आहेत.
मंदिर परिसरात फोटो काढण्यास बंदी (Kedarnath Mandir )आहे.
मंदिर परिसरात रिल बनवण्यास किंवा कोणताही व्हिडीओ शूट करण्यास मनाई आहे.

News Title –  Kedarnath Mandir will open on 10 May 2024 

महत्त्वाच्या बातम्या-

सब पैसों का खेल है बाबू भैय्या! मुंबईत ऐन निवडणुकीच्या काळात 4 कोटी 70 लाख जप्त

शाॅरमा आवडीने खात असाल तर आत्ताच व्हा सावध; 19 वर्षीय तरुणाने गमावला जीव

‘आगामी काळात…’; शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

T20 World Cup बाबत रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी!

“शाहरुखपेक्षा जास्त पैशांची ऑफर होती पण..”, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या वक्तव्याने खळबळ