T20 World Cup बाबत रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

T20 World Cup | सध्या देशात लोकसभा निवडणुकीप्रमाणे आयपीएलचा माहोल आहे. यंदा मुंबई इंडियन्सचे चाहते संघात केलेल्या बदलाला घेऊन आणि संघाच्या कामगिरीला घेऊन नाराज आहेत. आयपीएल संपल्यानंतर आता क्रिकेट चाहतेच नाहीतर संपूर्ण देश आणि जागाचं लक्ष हे टी 20 विश्वचषकाकडे (T20 World Cup) लागलं आहे. हा विश्वचषक 2 जूनपासून अमेरिका-वेस्टइंडिज येथे होणार आहे. टीम इंडियाला आता दोन असे खेळाडू आहेत ते चॅम्पिअन करतील, असं रवी शास्त्री यांनी सांगितलं आहे.

2 जूनपासून विश्वचषक सुरू होणार

आयपीएलनंतर महत्त्वाचा टी 20 विश्वचषक (T20 World Cup) पार पडणार आहे. हा विश्वचषक 2 जूनपासून सुरू होणार आहे. तर टीम इंडियाचा पहिलाच सामना हा 5 जून रोजी आयर्लंड विरूद्ध होणार आहे. या विश्वचषकाच्या विजयासाठी एक जबरदस्त संघ बनवण्यात आला.

टी 20 विश्वचषकात (T20 World Cup) कोणते खेळाडू सर्वोत्तम प्रदर्शन करतील याबाबत माजी क्रिकेटपटू आणि उत्कृष्ट सूत्रसंचालक रवी शास्त्री यांनी सांगितलं आहे. आतापर्यंत रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यावर अनेकांचं लक्ष होतं. मात्र रवी शास्त्री यांनी यंग खेळाडूंची नावं घेतली आहेत.

यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे गेम चेंजर ठरणार

रवी शास्त्री यांनी बोलत असताना यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे दोघेही डावखुरे फलंदाज असल्याचं सांगितलं आहे. दोघेही बिंधास्त क्रिकेट खेळत असतात. जयस्वालने इंग्लंड विरूद्ध चांगली कामगिरी केली. 2024 मध्ये त्याने चांगली कामगिरी करत शतक ठोकलं होतं. तर सध्या तो आयपीएलमध्ये देखील जबरदस्त कामगिरी करत आहे.

रवी शास्त्री यांनी शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वालचं नाव घेतलं आहे. यशस्वी हा मिडल ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करू शकतो. चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळता असताना त्याने 170 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 350 धावा केल्या होत्या यावरून रवी शास्त्री यांनी तर्क लावला आहे. (T20 World Cup)

शिवम दुबे हा स्पिनर्स विरूद्ध चांगली फलंदाजी करतो. रिंकू सिंहच्या जागी शिवम दुबेला प्राधान्य देण्यात आलं. दुबे मीडियम पेस गोलंदाजी करतो. T20 वर्ल्डकप संघात ऑलराऊंडरची आवश्यकता आहे.

News Title – T20 World Cup 2024 Ravi Shastri Say Shivam Dubey And Yashasvi Jaiswal Best Game Changer Players In India

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार! ‘या’ दिवशी पावसाची शक्यता

अजित पवारांची धाकधूक वाढली; शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट

या अक्षय तृतीयेला दणक्यात घरी आणा टोयोटा कंपनीची नवी कोरी कार; किंमत काय?

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर अखेर शिक्कामोर्तब!

राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरु; जाणून घ्या पुढील तीन दिवस हवामान कसं असेल