छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर अखेर शिक्कामोर्तब!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra | राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात दोन जिल्ह्यांच्या नामांतराबाबत आज 8 मे रोजी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीतील अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद बाबत एक महत्वाचा निर्णय घेतला होता.

जून 2022 मध्ये औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मविआ सरकार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस यांचं सरकार राज्यात स्थापन झालं.

औरंगाबाद आणि उस्मानाबादबाबत मोठा निर्णय

या सरकारने (Maharashtra) ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे कारण पुढे करीत उद्धव ठाकरे यांनी नमांतरबाबत घेतलेला निर्णय स्थगित केला होता. त्यानंतर पुढच्याच महिन्यात औरंगाबादचे पुन्हा नामांतर करण्यात आले. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारने संभाजीनगर नावापुढे छत्रपती असे नामविशेष जोडून “छत्रपती संभाजीनगर”, असे नामकरण केले.

मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाश्यांकडून आव्हान देण्यात आलं होतं.याबाबत आज हायकोर्टात महत्वाचा निर्णय होणार होता. मुंबई उच्च न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये राखून ठेवलेला निर्णय आज जाहीर केला आहे.

हायकोर्टाचा राज्य सरकारला दिलासा

4 ऑक्टोबर 2023 रोजी यावर सुनावणी पूर्ण करत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने आपला अंतिम निकाल राखून ठेवला होता. तो निकाल आज जाहीर झाला आहे.

हायकोर्टाने राज्य सरकारने (Maharashtra) महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भागात उस्मानाबाद आणि औरंगाबाद यांचे अनुक्रमे धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय अतिशय योग्य असून या निर्णयामुळे कोणालाही फरक पडणार नाही, असा निकाल दिला आहे. तसंच स्थानिकांनी केलेल्या याचिका फेटाळल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नावावर शिक्कामोर्तब

सदरील याचिका फेटाळताना हायकोर्टाने कोणताही आर्थिक दंड लावू इच्छित नाही, असंही म्हटलं आहे. यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण करण्यासाठी घेतलेला निर्णय कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणारा नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. यामुळे नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे.

News Title – Maharashtra Aurangabad-Osmanabad District renaming Decision Announced