राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरु; जाणून घ्या पुढील तीन दिवस हवामान कसं असेल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Updates l गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. सध्या उन्हाळा ऋतू सुरु आहे. तरी देखील राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ सुरु :

राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरु असला तरी देखील मुंबई आणि उपनगरात उष्णतेमुळे नागरीक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. अशातच आता हवामान विभागाने राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा वर्तवला आहे, तर काही भागात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात विभागातील तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त राहणार आहे. याशिवाय राज्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासह इतर दोन जिल्ह्यात उष्णतेची विश्रांती मिळणार आहे. कारण या दोन्ही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Weather Updates l विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी :

बदलत्या वातावरणामुळे कोकण विभागातील हवामान काही प्रमाणात कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर, हातकणंगले येथे तापमान 33 अंश सेल्सिअस ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. कोकण विभागातील तापमान सामान्य पातळीपेक्षा 1.4 ते 2 अंश सेल्सिअसने जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय विदर्भातील वातावरणात देखील बदल होणार आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडणार आहे. त्यामुळे विदर्भात पुढील तीन दिवस जोरदार अवकाळी पावसाची हजेरी लावण्याची शक्यता आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, वाशिम, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी 10 मे पर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

News Title – Today Maharashtra Weather Updates

महत्त्वाच्या बातम्या

आज औरंगाबाद-उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतरावर अंतिम फैसला होणार! निकालाकडे राज्याचं लक्ष

शेअर बाजारात घसरण; तरीही ‘हा’ शेयर तुम्हाला करणार लखपती

‘या’ तरुणाने केला मुख्यमंत्र्यांचा पाठलाग; नेमकं यामागचं कारण काय?

कोव्हीशील्ड लसी संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी समोर

वृषभ, कन्येसाहित ‘या’ राशींना बक्कळ पैसे कमावण्याची संधी