‘या’ तरुणाने केला मुख्यमंत्र्यांचा पाठलाग; नेमकं यामागचं कारण काय?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde l गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यस्त आहेत. अशातच आता एका तरूणाने एकनाथ शिंदेंचा पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 5 मे 2024 ला रात्री ठाण्याहून मुंबईला येत असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

तरुणाने केला मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; गुन्हा दाखल

यासंदर्भात आधी माहिती अशी की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग एका तरूणाकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी 30 वर्षीय तरुणावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पाठलाग करणाऱ्या तरुणाचं शुभम कुमार असं नाव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा रविवारी (5 मे 2024) रात्री ठाण्याहून मुंबईला येत असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याप्रकरणी त्या तरुणाला पोलिसांनी वारंवार इशारा देऊन देखील तो तरुण थांबला नाही आणि त्याने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग सुरूच ठेवला. या सर्व प्रकारानंतर शुभम कुमार या तरुणाला पोलिसांनी थांबवलं आणि चौकशी केली. त्यावेळी त्याने आपण अभिनेता असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. या घटनेनंतर वांद्रे पोलिसांनी शुभमला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Eknath Shinde l नेमकी घटना कशी घडली? :

मुख्यमंत्र्यांचा ताफा हा रविवारी रात्री ठाण्याहून मुंबईला येत असताना हा प्रकार घडला आहे. सी लिंकवर पोलीस वाहतूक नियमन करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ताफ्यासाठी सी लिंकवरील लेन 7 आणि लेन 8 ही रिकामी करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना त्या तरुणाला गाडी सहाव्या लेनमध्ये टाकण्यास वाहतूक पोलिसांनी सांगितलं होत.

मात्र त्या तरुणाने सातव्या लेनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घेतली. त्यानंतरही तरुण मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्यामागे गाडी चालवत होता. मात्र त्यावेळी पोलिसांनी त्याला वरळी सी लिंक येथे केला. मात्र तो तरुण थांबला नाही. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवलं आणि त्याची चौकशी केली. त्यावेळी त्यानी तो अभिनेता असल्याचं सांगितलं. मात्र आता या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

News Title – youth chased the convoy of the Chief Minister

महत्त्वाच्या बातम्या

कोव्हीशील्ड लसी संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी समोर

वृषभ, कन्येसाहित ‘या’ राशींना बक्कळ पैसे कमावण्याची संधी

बारामती संपताच शरद पवारांचं ‘मिशन शिरुर’, आढळराव पाटलांचं गणित बिघडणार?

पैसे खिशात टिकत नसतील तर करा ‘हा’ उपाय

बारामतीच्या लढाईत मोठा ट्विस्ट, रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ