बारामती संपताच शरद पवारांचं ‘मिशन शिरुर’, आढळराव पाटलांचं गणित बिघडणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shirur Loksabha 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीचे मतदान 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजता समाप्त झाले. त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. बारामती लोकसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर शरद पवार हे पुन्हा एकदा 8 मे रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur Loksabha 2024) पंचकंदील चौकात अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभेत आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. यावेळी शरद पवार काय बोलणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

गेल्या 22 दिवस शरद पवार यांनी बऱ्याच सभा घेतल्या आहेत. तर अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार यांनी आतापर्यंत तीन सभा घेतल्या आहेत. तर आता पुन्हा एकदा शरद पवार हे शिरूर मतदारसंघात (Shirur Loksabha 2024) दिसणार आहेत. यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अनेक दिवसांपासून ते सभा घेत असल्याने त्यांच्या प्रकृती बिघाडली होती. त्यांना बोलता देखील येत नव्हतं त्यामुळे त्यांनी बीडची सभा रद्द केली.

आपल्या लेकीसाठी त्यांनी आज बारामतीतील माळेगाव येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत मतदानाचा अधिकार बजावला आहे. तर आता शिरूर लोकसभा (Shirur Loksabha 2024) मतदारसंघात त्यांची तोफ धडाडणार आहे. अमोल कोल्हेंच्या सभेसाठी महाविकास आघाडीचे दिग्गज नेते आपली उपस्थिती दर्शवणार आहे.

आढळराव पाटील यांचं गणित बिघडणार?

अमोल कोल्हे हे गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रचारात शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रश्नांबाबत, पॉलिसी मेकिंग संदर्भात मुद्दे मांडत आहेत. एकीकडे अमोल कोल्हे हे धोरणांवरती, मतदार संघात येऊ घातलेल्या प्रकल्पांविषयी बोलत असताना विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या विरोधात वैयक्तिक पातळीवर टीका केली जात आहे. कोल्हे हे मुद्द्यावर बोलताना दिसतात. ओतूर येथे झालेल्या एका सभेत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीत संसदेत विचारलेल्या प्रश्नावर आरोप केले होते. (Shirur Loksabha 2024)

नुकतेच अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मीडियावर दोन व्हिडीओ शेअर केले होते आणि ते व्हायरल झाले. यातून त्यांनी आढळराव खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता. आता शिरूर येथील होणाऱ्या सभेत आणखी अमोल कोल्हे आढळराव पाटील यांच्याबाबतीत कोणते गौप्यस्फोट बाहेर काढतील याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. यामुळे आता आढळराव पाटील यांचं गणित बिघडण्याची चिन्हे अधिकाधिक पाहायला मिळतील.

काका-पुतण्या पुन्हा आमने सामने

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली आहे. आतापर्यंत अजित पवार आणि शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार करत होते. मात्र आता बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार पार पडला आहे. आता शरद पवार हे शिरूरमधून अमोल कोल्हेंच्या प्रचारसभेत काय बोलतील? तसेच दुसरीकडे अजितदादा आढळराव पाटील यांच्याकडून काय बोलतील हे पाहणं गरजेचं असणार आहे.

News Title – Shirur Loksabha 2024 Election Sharad Pawar attend Amol Kolhe Campaign

महत्त्वाच्या बातम्या

मतदानादिवशीच किरण सामंत गायब?; अखेर उदय सामंतांनी केला मोठा खुलासा

कांदा भाजपला रडवणार?; शेतकऱ्याने EVM मशीनवर कांदा ठेवला अन्…

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; दररोज 250 रुपयांची बचत बनवेल लखपती!

आमदार दत्तात्रेय भरणेंची सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, व्हिडीओ तूफान व्हायरल

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मोठा ट्विस्ट, नारायण राणेंच्या अडचणीत वाढ