आमदार दत्तात्रेय भरणेंची सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, व्हिडीओ तूफान व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Loksabha 2024 | बारामती लोकसभा मतदारसंघात आज 7 मे रोजी मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर इंदापूरचे आमदार दत्ता भरणे अजित पवार गटात गेले. आमदार दत्तात्रेय भरणे सुनेत्रा पवार यांच्या प्रचार करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha 2024) दडपशाहीचं राजकारण सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. नुकताच भरणे यांनी सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Baramati Loksabha 2024)

इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे (Datta Bharne) हे अजित पवार (Baramati Loksabha 2024) यांच्या गटातून सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना दिसत आहेत. ते सुप्रिया सुळे यांचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करताना दिसत आहेत. रोहित पवार हे कालपासून अजित पवार गटाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. तर आता रोहित पवार यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Baramati Loksabha 2024)

रोहित पवार यांचं ट्विट चर्चेत

“केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!”, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

रोहित पवार हे अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत आहेत. व्हिडीओच्या माध्यमातून ते बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गौप्यस्फोट बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दत्तात्रेय भरणे यांनी शिवीगाळ केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. यावरून बारामतीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी लक्ष घातलं आहे.

भरणेंच्या शिवीगाळ प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी घातलं लक्ष

मी कार्यकर्त्यांकडून व्हिडीओबाबत माहिती घेत आहे. या व्हिडीओतील प्रकार नेमका कुठे घडला, हा प्रकार कसा घडला याचा तपशील घेत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना विचारणा देखील केली होती. त्या व्हिडीओत नाना गवळी असल्याचं कार्यकर्ते म्हणालेत.

यामध्ये केवळ भरणेच शिवीगाळ करत आहेत. नाना या व्हिडीओत दिसत नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यावर कार्यकर्ते म्हणाले की आम्ही नानांचा आवाज ओळखला आहे. भरणे नाना यांनाच शिवीगाळ करत होते, असं सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते म्हणाले.

News Title – Baramati Loksabha 2024 Ajit Pawar Mla Datta Bharne Bad Words Use To Supriya Sule Supporters

महत्त्वाच्या बातम्या

“…तर अजित दादा तुम्ही आज मुख्यमंत्री असता”

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या गाडीवर हल्ला, नेमकं काय घडलं?

लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

मतदान केंद्रांवर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली ‘ही’ मोठी भीती, म्हणाल्या…

मोठी बातमी! सुप्रिया सुळे अचानक पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, राजकारणात खळबळ