लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरू आहे. पवार विरूद्ध पवार अशी लढत आहे. बारामती मतदारसंघातील भोर, मुळशी, वेल्हा, दौंड, इंदापूर, बारामती हे बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहेत. याकडे निवडणुुकीकडे केवळ राज्य नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे आतापर्यंत मुंबई येथे मतदान करायचे मात्र आता लेक सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीतील मतदान केंद्रावर जात मतदान केलं आहे.

सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबईतील मतदार यादीतून नाव वगळलं आहे. त्यांनी बारामती जिल्हापरिषदेच्या शाळेत मतदान केंद्रावर जात मतदान केलं आहे. त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांचे कुटुंब आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे कुटुंब देखील उपस्थित होते. शरद पवार आणि सहकुटुंब बारामतीतील माळेगाव येथील गोविंद बागेत राहतात.

माळेगाव येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, रेवती सुळे, विजय सुळे यांनी मतदान केलं आहे. आता पर्यंत शरद पवार यांचा मुंबईतील महालक्ष्मी येथील यार्ड क्रमांक 214 येथील शरद पवार, रेवती सुळे, सदानंद सुळे यांचा मतदार यादीत समावेश होता. मात्र यंदा बारामती लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी मतदान केलं आहे.

पवार कुटुंबाची यादी

शरद पवार, प्रतिभा पवार, सदानंद सुळे, रेवती सुळे, विजय सुळे, रणजित पवार, अभिजीत पवार, प्रतापराव गोविंदराव पवार, शांतिशिला वसंतदारव पवार, मिनाश्री पवार, भारती पवार, शुभांगी पवार यांनी बारामती लोकसभा निवडणुकीत मतदान केलं आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद विरूद्ध भाऊजय यांच्यात टक्कर होत आहे. बारामतीकर कोणाला आपल्या विश्वासाचं मत देणार हे पाहणं गरजेचं आहे. मतदानावरून बारामतीकर संभ्रम अवस्थेत पाहायला मिळत आहेत. दोन्हीही एकाच कुटुंबातील उमेदवार असल्याने बारामतीकर संभ्रम अवस्थेत असल्याचं चित्र आहे.

एक्झिट पोलचा विचार केला तर सुप्रिया सुळे यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र मतदान झाल्यानंतर याचा निकाल हा येत्या 4 जून रोजी होणार आहे. त्याचवेळी याबाबत ठोस माहिती समोर येईल.

News Title – Sharad Pawar Cancel Name From Mumbai Mahalaxmi Colony And After Long Time Vote In Baramati Loksabha

महत्त्वाच्या बातम्या

कोण आहेत त्या 11 जागांवरचे टॉपचे खिलाडी? गड पार करून विजयाची पताका कोण फडकवणार?

…तर विरोधकांचं डोकं फिरलय; अजित पवारांचा घरच्या व्यक्तीवर अत्यंत कडू शब्दात प्रत्यारोप

मध्यरात्री बारामतीत पडला पैशांचा पाऊस; रोहित पवारांनी केला व्हिडीओ शेअर

धाकधूक वाढली! तिसऱ्या टप्प्यातील ‘या’ दिग्गजांचे भवितव्य ठरणार; कोण बाजी मारणार

आज ‘या’ राशींना मिळेल सुखाचा गारवा; बक्कळ पैशांसह प्रेमप्रकरणात मिळेल यश