मतदान केंद्रांवर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली ‘ही’ मोठी भीती, म्हणाल्या…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Supriya Sule | आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदार पार पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे प्रचारासाठी फिरफिर फिरत होते. आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होतंय. त्यात बारामती लोकसभा मतदान संघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मतदार मतदान बुथवर जात मतदानाचा अधिकार बजावत आहेत. याचपार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मतदान केंद्रावरील बुथबाबत भीती व्यक्त केलीये.

मतदान केंद्रांवर सुप्रिया सुळेंनी भीती केली व्यक्त

बारामती लोकसभा मतदारसंघात 23 लाख 72 हजार मतदार आपला मतदानाचा आज हक्क बजावणार आहेत. 2516 मतदान केंद्रावर मतदान पार पडत आहे. देशाचं लक्ष या मतदानावर लागलं आहे. 2516 मतदान केंद्रांपैकी 157 मतदान केंद्रावर बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भीती व्यक्त केली आहे. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देखील लिहिलं आहे.

भोर, पुरंदर, वेल्हा, मुळशी, इंदापूर, दौंड आणि बारामती यांचा या बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. त्यातील शहरातील 12, ग्रामीण भागातील 47, दौंडमध्ये 33, पुरंदर 31, भोरमध्ये 31 तर खडकवासला येथे 3 मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गैरप्रकार घडण्याचा संशय व्यक्त केला आहे.

पत्रात काय लिहिलं?

निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांना सुप्रिया सुळे यांनी 157 मतदान केंद्रावर गैरप्रकार घडण्याबाबत भीती व्यक्त केली असून पत्र देखील लिहिलं आहे. द्विवेदी यांनी सुप्रिया सुळे यांची तक्रार आल्याबाबत सांगितलं आहे. याचं ठोस कारण नमूद केलं नाही. पण तरीही अधिकाऱ्यांना दक्ष राहण्यास सांगितलं असल्याचं द्विवेदी म्हणाल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरूद्ध भावजय असा मुकाबला आहे. मतदार मतदान करण्यासाठी आपल्या स्थानिक बुथकेंद्रावर जात मतदान करत आहेत. काही एक्झिट पोलच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा विजय होणार असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, काल मध्यरात्री बारामती लोकसभा मतदारसंघात पैशांचा पाऊस पडल्याचा धक्कादायक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत माहिती देखील दिली आहे. तसेच व्हिडीओमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत काही पोलीस देखील होते. यामुळे Y सेक्युरिटी हवी होती काय़?, असा सवाल त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

News Title – Supriya Sule doubt About 157 Voting Booth Baramati Loksabha

महत्त्वाच्या बातम्या

…तर विरोधकांचं डोकं फिरलय; अजित पवारांचा घरच्या व्यक्तीवर अत्यंत कडू शब्दात प्रत्यारोप

मध्यरात्री बारामतीत पडला पैशांचा पाऊस; रोहित पवारांनी केला व्हिडीओ शेअर

धाकधूक वाढली! तिसऱ्या टप्प्यातील ‘या’ दिग्गजांचे भवितव्य ठरणार; कोण बाजी मारणार

आज ‘या’ राशींना मिळेल सुखाचा गारवा; बक्कळ पैशांसह प्रेमप्रकरणात मिळेल यश

ठाण्यातील राजकारण तापलं; राजन विचारेंचा नरेश म्हस्केंबाबत मोठा गोप्यस्फोट