मोठी बातमी! सुप्रिया सुळे अचानक पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, राजकारणात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Lok Sabha | संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या बारामतीमध्ये आज (7 मे) मतदान पार पडत आहे. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा हा सामना होणार आहे. त्यामुळे सर्वांचंच लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे.

अशात बारामतीमध्ये राजकीय घडामोडींना अधिकच वेग आल्याचं दिसत आहे. आज मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे या थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरी पोहोचल्या आहेत. सुळे बारामतीमधील काठेवाडीत मतदानासाठी दाखल झाल्या. त्यानंतर त्या थेट अजित दादाकडे रवाना झाल्या.

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

सुप्रिया सुळे या पाच मिनिटे त्या ठिकाणी होत्या. त्यानंतर त्या निघून गेल्या. आता सुळे या तिथे नेमकं कशासाठी गेल्या, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काठेवाडी येथील घरी आज 11 वाजेच्या सुमारास दाखल झाल्या.

यावेळी अजित पवार घरीच होते. परंतु सुनेत्रा पवार नव्हत्या. त्या काकींची भेट घेणे आणि प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्याशी काही चर्चा केली नाही. त्या फक्त त्यांच्या काकी आशाताई पवार यांनाच भेटल्या, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना (Baramati Lok Sabha) सांगितलं.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

मी आशा काकी यांना नमस्कार करण्यासाठी आले होते. घरात फक्त मी आणि काकीच होते. मी फक्त काकींची भेट घेतली, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी (Baramati Lok Sabha) त्यांना तुम्ही अजित पवार यांच्या घरी अचानक आल्या?, असा प्रश्न केला. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

“हे माझ्या काका, काकींचं घर आहे. माझ्या आयुष्यातील लहाणपण याच घरात गेलं आहे. मी या घरात दोन- दोन महिने राहिले आहे. त्यावेळी दोन-दोन महिने माझ्या आईशी बोलणं होत नव्हतं. जेवढे माझ्या आईंनी माझं केलं नाही, तेवढे माझ्या सर्व काकींनी माझ्यासाठी केलं आहे.”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यातून राजकीय संघर्ष असला तरी कौटुंबिक नातेसंबंध अजूनही जपले जातायेत, असंच दिसून येतंय.

News Title –  Baramati Lok Sabha Supriya Sule at Ajit Pawar house

महत्त्वाच्या बातम्या-

मोबाईल चोरीला गेल्यास अशाप्रकारे करा Phone Pay, Paytm बंद; अन्यथा बँक खातं होऊ शकतं रिकाम

कोण आहेत त्या 11 जागांवरचे टॉपचे खिलाडी? गड पार करून विजयाची पताका कोण फडकवणार?

…तर विरोधकांचं डोकं फिरलय; अजित पवारांचा घरच्या व्यक्तीवर अत्यंत कडू शब्दात प्रत्यारोप

मध्यरात्री बारामतीत पडला पैशांचा पाऊस; रोहित पवारांनी केला व्हिडीओ शेअर

धाकधूक वाढली! तिसऱ्या टप्प्यातील ‘या’ दिग्गजांचे भवितव्य ठरणार; कोण बाजी मारणार