Deactivate UPI l आजकाल नागरिक UPI द्वारे पैसे देण्यास प्राधान्य देतात. अगदी ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन शॉपिंग असो नागरिक मात्र शॉपिंगमध्ये पेमेंट देखील UPI वरूनच करतात. मात्र जर तुमचा स्मार्टफोन चुकून गहाळ झाला किंवा हरवला तर काय होऊ शकत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर टेन्शन घेऊ नका. अशावेळी तुम्ही तुमचे Phone Pay, Paytm, Google Pay आणि UPI आयडी ब्लॉक करू शकता.
जर फोन हरवल्याबरोबर तुम्ही त्यांना ब्लॉक न केल्यास फोन चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडल्यास तुमचे खाते पूर्णपणे रिकामे होऊ शकते. म्हणूनच आज आपण UPI, Google Pay आणि Paytm हे खाते कशाप्रकारे ब्लॉक केले जातात हे पाहणार आहोत.
पेटीएम यूपीआय आयडी कसा ब्लॉक करायचा :
– सर्वात प्रथम पेटीएम बँकेच्या हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करा.
– यानंतर Lost Phone पर्याय निवडा.
– येथे तुम्हाला हरवलेल्या फोनचा नंबर टाकण्याचा पर्याय मिळेल.
– त्यानंतर तुम्हाला सर्व उपकरणांमधून लॉगआउट पर्याय निवडावा लागेल.
– यानंतर पेटीएम वेबसाइटवर जा आणि 24×7 मदत पर्याय निवडा.
– अशाप्रकारे तुम्ही रिपोर्ट अ फ्रॉड किंवा आम्हाला संदेश द्या हा पर्याय निवडू शकता.
– त्यानंतर तुम्हाला पोलिस FIR द्यावी लागेल. सर्व तपशील तपासल्यानंतर तुमचे पेटीएम खाते तात्पुरते बंद केले जाईल.
अशाप्रकारे करा Google Pay बंद :
– सर्वात पहिल्यांदा कोणत्याही फोनवरून 18004190157 हा नंबर डायल करा.
– यानंतर ग्राहक सेवांना पेटीएम खाते ब्लॉक करण्याबाबत माहिती द्यावी लागेल.
– तसेच जर तुम्ही Android वापरकर्ते असाल तर तुम्हाला PC किंवा फोनवर Google Find My Funo वर लॉग इन करावं लागणार आहे. यानंतर तुम्हाला Google Pay चा सर्व डेटा डिलीट करावा लागेल. यानंतर तुमचे Google Pay अकाउंट तात्पुरते ब्लॉक केले जाईल.
– तुम्ही iOS वापरकर्ता असल्यास, Find my app आणि इतर Apple अधिकृत टूल्सद्वारे सर्व डेटा हटवून तुम्ही Google Pay खाते ब्लॉक करू शकता.
Deactivate UPI l फोनपे यूपीआय आयडी कसा ब्लॉक करायचा :
– सर्वप्रथम 02268727374 किंवा 08068727374 वर कॉल करा.
– ज्या मोबाईल नंबरशी UPI आयडी लिंक आहे त्या विरुद्ध तक्रार दाखल करा.
– यानंतर OTP मागितल्यावर तुम्हाला सिम कार्ड आणि डिव्हाइस हरवण्याचा ऑप्शन निवडावा लागेल.
– यानंतर तुमचा फोन तुम्ही कस्टमर केअरशी कनेक्ट होईल. त्यानंतर तुम्ही काही माहिती देऊन UPI आयडी तात्पुरते ब्लॉक करू शकता.
News Title – How To Deactivate Your UPI ID
महत्त्वाच्या बातम्या
कोण आहेत त्या 11 जागांवरचे टॉपचे खिलाडी? गड पार करून विजयाची पताका कोण फडकवणार?
…तर विरोधकांचं डोकं फिरलय; अजित पवारांचा घरच्या व्यक्तीवर अत्यंत कडू शब्दात प्रत्यारोप
मध्यरात्री बारामतीत पडला पैशांचा पाऊस; रोहित पवारांनी केला व्हिडीओ शेअर
धाकधूक वाढली! तिसऱ्या टप्प्यातील ‘या’ दिग्गजांचे भवितव्य ठरणार; कोण बाजी मारणार
आज ‘या’ राशींना मिळेल सुखाचा गारवा; बक्कळ पैशांसह प्रेमप्रकरणात मिळेल यश