ड्रेसिंग रूममध्ये जाताच रोहित रडू लागला; चाहत्यांची चिंता वाढली, व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma Crying l मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये रडताना दिसला, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा एकटा बसून डोळे मिटून रडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सोमवारी रात्री मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला ज्यामध्ये मुंबई संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. मात्र या सामन्यादरम्यान रोहित पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. यंदाच्या वर्षी रोहितची आयपीएलमध्ये चांगली कामगिरी काही खास नाही. अशा परिस्थितीत टी-20 विश्वचषकापूर्वी त्याचा खराब फॉर्म आणि त्याच्या या व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

रोहितचा ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ समोर :

काल झालेल्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात रोहित अवघ्या 4 धावा करून परतला. त्याला या सामन्यात विशेष काही करता आले नाही. याशिवाय 2024 च्या मोसमाच्या सुरुवातीला मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून हटवले होते. रोहितने मोसमातील पहिल्या 7 डावात 297 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये दिल्लीविरुद्ध 49 धावा आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 105 नाबाद धावा केल्या होत्या. पण यानंतर पुढच्या 4 सामन्यात त्याला केवळ 34 धावाच करता आल्या आहेत.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद व्हावे लागले. रोहितला स्क्वेअरच्या दिशेने फ्लिक करून शॉट खेळायचा होता पण बॅटच्या काठामुळे चेंडू हवेत गेला आणि यष्टिरक्षक हेन्री क्लासेनने तो झेलला. यावेळी रोहित ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि एकटाच रडताना दिसला आहे.

 

Rohit Sharma Crying l रोहितकडे आणखी दोन संधी :

रोहित शर्मा टी-20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाचा कर्णधार आहे. पण आगामी विश्वचषकात रोहितला त्याचा खराब फॉर्म मागे सोडून प्रत्येक सामन्यात संघाला चांगली सुरुवात करावी लागेल. आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची ही शेवटची संधी असल्याचे रोहितने आधीच स्पष्ट केले आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2024 चा एकदिवसीय विश्वचषक गमावला होता. अशास्थितीत अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी रोहितकडे आणखी दोन संधी आहेत. या दोन सामन्यांत रोहितला आपला फॉर्म परत मिळवावा लागणार आहे. टीम इंडियाला 5 जूनला आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. त्यामुळे रोहितच्या कामगिरीकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

News Title – Rohit Sharma Crying Video

महत्त्वाच्या बातम्या

मोबाईल चोरीला गेल्यास अशाप्रकारे करा Phone Pay, Paytm बंद; अन्यथा बँक खातं होऊ शकतं रिकाम

कोण आहेत त्या 11 जागांवरचे टॉपचे खिलाडी? गड पार करून विजयाची पताका कोण फडकवणार?

…तर विरोधकांचं डोकं फिरलय; अजित पवारांचा घरच्या व्यक्तीवर अत्यंत कडू शब्दात प्रत्यारोप

मध्यरात्री बारामतीत पडला पैशांचा पाऊस; रोहित पवारांनी केला व्हिडीओ शेअर

धाकधूक वाढली! तिसऱ्या टप्प्यातील ‘या’ दिग्गजांचे भवितव्य ठरणार; कोण बाजी मारणार