कोण आहेत त्या 11 जागांवरचे टॉपचे खिलाडी? गड पार करून विजयाची पताका कोण फडकवणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Loksabha Election l आज महाराष्ट्रातील 48 पैकी 11 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे, जिथे शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात निवडणूक लढवत आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील रायगड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांवर निवडणूक होत आहे.

या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष :

महाराष्ट्रातील प्रमुख उमेदवारांमध्ये कोल्हापूर मतदारसंघातून काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज, सातारा मतदारसंघातून भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समावेश आहे.

मात्र या लोकसभा निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण या 11 लोकसभा मतदार संघात अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर आज आपण जाणून घेऊयात कोणत्या मतदार संघात कोणकोणत्या नेत्यांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

Loksabha Election l कोणता उमेदवार विजयाची पताका फडकवणार?

सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार
उदयनराजे भोसले Vs शशिकांत शिंदे
विनायक राऊत Vs नारायण राणे
शाहु महाराज Vs संजय मंडलिक
प्रणिती शिंदे Vs राम सातपुते
शिवाजी काळगे Vs सुधाकर श्रृंगारे
ओमराजे निंबाळकर Vs अर्चना पाटील
अनंत गीते Vs सुनील तटकरे
संजयकाका पाटील Vs चंद्राहार पाटील Vs विशाल पाटील
धैर्यशील माने Vs राजू शेट्टी Vs सत्यजित पाटील सरुडकर
रणजितसिंह नाईक निंबाळकर Vs धैर्यशील मोहिते पाटील

सकाळी 9 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 6.64 टक्के मतदान :

1. लातूर – 7.91 टक्के
2. सांगली – 5.81 टक्के
3. बारामती – 5.77 टक्के
4. हातकणंगले – 7.55 टक्के
5. कोल्हापूर – 8.04 टक्के
6. मळा – 4.99 टक्के
7. धाराशिव – 5.79 टक्के
8. रायगड – 6.84 टक्के
9. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 8.17 टक्के
10. सातारा – 7.00 टक्के
11. सोलापूर – 5.92 टक्के

News Title – Maharashtra Lok Sabha Election 2024 Live

…तर विरोधकांचं डोकं फिरलय; अजित पवारांचा घरच्या व्यक्तीवर अत्यंत कडू शब्दात प्रत्यारोप

मध्यरात्री बारामतीत पडला पैशांचा पाऊस; रोहित पवारांनी केला व्हिडीओ शेअर

धाकधूक वाढली! तिसऱ्या टप्प्यातील ‘या’ दिग्गजांचे भवितव्य ठरणार; कोण बाजी मारणार

आज ‘या’ राशींना मिळेल सुखाचा गारवा; बक्कळ पैशांसह प्रेमप्रकरणात मिळेल यश

ठाण्यातील राजकारण तापलं; राजन विचारेंचा नरेश म्हस्केंबाबत मोठा गोप्यस्फोट