वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या गाडीवर हल्ला, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vanchit Bahujan Aghadi | राज्यात तिसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान सुरू आहे. याकडे अनेकांच्या नजरा आहेत. त्याआधीच मध्यरात्री वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) उमेदावाराच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उत्कर्षा रूपवते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ घडला.

हल्ला करणारे अंधाराचा आधार घेत पसार झाले आहेत. सुदैवाने रूपवते यांच्यावर झालेल्या हल्ल्यात काहीही झालं नाही. मात्र त्यांच्या गाडीचं नुकसान झालं आहे. घडलेल्या घटनेत राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

नेमकं काय घडलं?

वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) नेत्या उत्कर्षा रूपवते या प्रचार आटोपून परतल्या होत्या. ते अकोले येथील चितळवेढे गावात सभा उरकून आल्या. यावेळी अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. हल्ला करणारे दोघेजण होते. यामध्ये गाडीला कोणतंही नुकसान झालं नाही. सुदैवाने रूपवते सुखरूप परतल्या. त्यांना काहीच झालं नाही.

घटनास्थळी पोलीस आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आले. त्याठिकाणी मोठा गोंधळ झाला. वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. हा गोंधळ शांत करण्याचं काम पोलीस आणि रूपवते यांनी मध्यस्ती केली तसेच कार्यकर्त्यांच्या कृतीवर नियंत्रण ठेवलं. (Vanchit Bahujan Aghadi)

उत्कर्षा यांचा जबाब

वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी घडलेल्या घटनेसंबंधीत सांगितलं. मी प्रचारावरून परतल्यानंतर फोनवर बोलत असताना काहीतरी आपटल्याचा आवाज आला. त्यावेळी तोंडात पावडर गेली. काचाही उडल्या होत्या.

तोंडावर काचा उडल्यानंतर त्या काचा डोळ्यात लागण्याची शक्यता होती. मात्र काहीही न झाल्याचं उत्कर्षा म्हणाल्या. कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छिते की मी सुखरूप आहे. कार्यकर्त्यांना सांगते की मी आपला प्रचार सुरूच ठेवावा. याप्रकरणावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं उत्कर्षा रूपवते म्हणाल्या.

News Title – Vanchit Bahujan Aghadi Shirdi Loksabha Candidate Utkarsha Rupawate Car Attack

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! सुप्रिया सुळे अचानक पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, राजकारणात खळबळ

ड्रेसिंग रूममध्ये जाताच रोहित रडू लागला; चाहत्यांची चिंता वाढली, व्हिडीओ व्हायरल

मोबाईल चोरीला गेल्यास अशाप्रकारे करा Phone Pay, Paytm बंद; अन्यथा बँक खातं होऊ शकतं रिकाम

कोण आहेत त्या 11 जागांवरचे टॉपचे खिलाडी? गड पार करून विजयाची पताका कोण फडकवणार?

…तर विरोधकांचं डोकं फिरलय; अजित पवारांचा घरच्या व्यक्तीवर अत्यंत कडू शब्दात प्रत्यारोप