रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मोठा ट्विस्ट, नारायण राणेंच्या अडचणीत वाढ

Narayan Rane

Kiran Samant Not Reachable | रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात देखील प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळत आहे. भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोकणातील ही प्रतिष्ठेची लढत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र अशातच किरण सामंत हे नॉटरिचेबल (Kiran Samant Not Reachable) लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

किरण सामंत नॉटरिचेबल

मतदानादिवशीच किरण सामंत हे नॉटरिचेबल (Kiran Samant Not Reachable) असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांआधी किरण सामंत आणि शिंदे गटाने याजागेवर दावा केला होता. मात्र भाजपचे नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर काही दिवसांआधी किरण सामंत (Kiran Samant Not Reachable) यांनी आपले बंधू उदय सामंत यांचा फोटो मध्यवर्ती शिवसेना कार्यालयातून काढला आणि किरण सामंत यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.

किरण सामंत यांनी व्हॅट्सअॅपला पोस्ट शेअर केली. ते त्या पोस्टमुळे चर्चेत आले होते. त्याची सध्या चर्चा आहे. मात्र निवडणुकीदिवशी किरण सामंत यांना फोन लावला असता ते नॉटरिचेबल (Kiran Samant Not Reachable) लागत आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लावले जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांआधी किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. अखेर त्यांची समजूत काढण्यात आली आणि भाजपकडून राणेंना उमेदवारी देण्यात आली. यानंतर दोन्ही भावांनी राणेंना पाठिंबा जाहीर केला होता.

नारायण राणे यांच्या महायुतीच्या प्रचारसभेला अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. यावेळी किरण सामंत यांचा देखील सन्मान करण्यात आला. किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शिंदे गटाचे नेते आहेत. मात्र ते निवडणुकीच्या दिवशीच त्यांचा पत्ता नसल्यानं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात निकालादिवशी ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांना रत्नागिरीतून मत मिळवून देण्याची जबाबदारी सामंत बंधूंकडे होती. मात्र एक सामंत हे नॉटरिचेबल असल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात काय होईल हे 4 जूनला निकालादिवशीच कळेल.

News Title – Kiran Samant Not reachable From Ratnagiri Sindhudurg Loksabha Election 2024

महत्त्वाच्या बातम्या

“आमच्या 86 वर्षाच्या आईला…”; भाऊ श्रीनिवास पवार पुन्हा अजित पवारांवर बरसले

पैसे वाटल्याच्या आरोपावर अजित पवारांचा पलटवार, म्हणाले ‘मी असले धंदे…’

“ऐश्वर्याचं सलमानवर आजही तितकंच प्रेम”; ‘तो’ व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल

“…तर अजितदादा तुम्ही आज मुख्यमंत्री असता”

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या गाडीवर हल्ला, नेमकं काय घडलं?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .