हातकणंगलेमध्ये राजकारण तापलं; कार्यकर्त्यांमध्ये तूफान हाणामारी

Hatkanangale Lok Sabha

Hatkanangale Lok Sabha | लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मतदान होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी शांततेत मतदान पार पडलं तर काही ठिकाणी प्रचंड गोंधळ झालेला पाहायला मिळाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन गटात तूफान हाणामारी झाली. वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धीर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला.

हातकणंगलेमध्ये कार्यकर्ते भिडले

यामुळे इथे काही वेळ प्रचंड गोंधळ झाल्याचं दिसून आलं. यामुळे मतदान काही काळासाठी थांबवावे लागले. पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर पुन्हा मतदान सुरु झाले. या घटनेची (Hatkanangale Lok Sabha) आता एकच चर्चा होऊ लागली आहे.

नेमकं काय घडलं?

महायुतीचे उमेदवार धर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या दोन गटात इथे जोरदार भांडण झालं. पुढे त्यांनी थेट हाणामारीच केली. मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधी आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत धैर्यशील माने यांच्या गटाने इथे गोंधळ घातला आणि मतदान केंद्र काही काळ बंद ठेवले.

यामुळे मविआ उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांचे कार्यकर्ते चांगलेच भडकले त्यांनी थेट जाब विचारत आक्रमकपणा दाखवला. या दोन्ही गटात अगोदर शाब्दिक वाद झाले. मात्र, नंतर त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं.

वाद अधिकच वाढल्याने पोलिसांनी (Hatkanangale Lok Sabha) मध्यस्थी केली आणि वाद मिटवला. आता घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या घटनेमुळे आता मविआकडून महायुतीवर टीका केली जात आहे.

News Title – Hatkanangale Lok Sabha Clash between the workers of Dhairyasheel Mane and Satyajit Patil

महत्त्वाच्या बातम्या-

पैसे वाटल्याच्या आरोपावर अजित पवारांचा पलटवार, म्हणाले ‘मी असले धंदे…’

“ऐश्वर्याचं सलमानवर आजही तितकंच प्रेम”; ‘तो’ व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल

“…तर अजितदादा तुम्ही आज मुख्यमंत्री असता”

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या गाडीवर हल्ला, नेमकं काय घडलं?

लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .