“अजून कसली वाट बघतोय”; अजित पवारांचा सख्ख्या भावाला थेट इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आज 7 मे रोजी मतदान पार पडत आहे. आज पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोन सदस्यांचं राजकीय भवितव्य मतपेटीमध्ये बंद होईल. त्यापूर्वी अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत एक महत्वाचं विधान केलं होतं.

“सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जूननंतर दिसणार नाही, जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन.”, असं अजित पवार म्हणाले होते. यावर त्यांचे बंधु श्रीनिवास पवार यांनी 4 जूननंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील, कारण विजय तर सुप्रिया सुळे यांचाच होणार, असं म्हटलं होतं.

आज अजित पवार यांनी आई आणि पत्नीसोबत मतदान करत सर्वच आरोप-प्रत्यारोप आणि टीकांचा समाचार घेतला. ते प्रसार माध्यमांसोबत संवाद साधत होते. यावेळी त्यांनी बंधु श्रीनिवास पवार यांना थेट इशाराच दिला. त्यामुळे राजकीय संघर्षामुळे पवार कुटुंबातील वाद संपण्याचं काही नावच घेत नसल्याचं दिसून येतंय.

काय म्हणाले अजित पवार?

अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मिशीसंदर्भातील वक्तव्यावर त्यांनी मिश्किल टिप्पणी देत ‘अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि काढ मिशा’, असं म्हटलं. त्याने 10 वर्षापूर्वी मिशी काढली. तो आता माझी मिशी काढण्याची वाट बघतोय. अजून तो कसली कसली वाट बघतोय ते मी पाहणारच आहे, असा इशारा यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला.

श्रीनिवास पवार काय म्हणाले होते?

“अजित दादा शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी फक्त जे म्हटलंय ते लक्षात ठेवावं. त्यांनी जर सर्व पवारांबाबत असं काही बोललं असेल तर त्यांनी 4 जूनपूर्वीच मिशा काढायला हव्यात. रोहित हा जन्माने बारामतीकर आहे. त्याचं घर आणि शेती इथेच आहे. त्यामुळे तो इथेच राहणार आहे. राहिला विषय माझा तर मी इथेच राहतो. त्यामुळे दादा यांनी दिलेला शब्द पाळावा”, असं श्रीनिवास पवार म्हणाले होते.

दरम्यान, श्रीनिवास पवार यांनी अजितदादांची आई पवार घराण्यातील संघर्षामुळे बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेल्या आहेत, असंही वक्तव्य केले होते. याबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलं.

आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब एकत्र असल्याचं दाखवलं. माझी आई सगळ्यात जेष्ठ आहे. ती माझ्याबरोबर आहे. आई कोल्हापूरला होती. माझ्या आत्याच्या मुलाचं लग्न होतं. मला तिने सांगितलं होते की, मी मतदानाला तुझ्यासोबत येईल. माझी आई माझ्याबरोबर आहे. आमचे कुटुंब फार मोठं आहे. आमच्या विरोधात फक्त तीन कुटुंब आहेत, बाकी कुणी माझ्याविरोधात नव्हते, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

News Title –  Ajit Pawar warning to Shrinivas Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

मतदान केंद्रांवर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली ‘ही’ मोठी भीती, म्हणाल्या…

मोठी बातमी! सुप्रिया सुळे अचानक पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, राजकारणात खळबळ

ड्रेसिंग रूममध्ये जाताच रोहित रडू लागला; चाहत्यांची चिंता वाढली, व्हिडीओ व्हायरल

मोबाईल चोरीला गेल्यास अशाप्रकारे करा Phone Pay, Paytm बंद; अन्यथा बँक खातं होऊ शकतं रिकाम