पैसे वाटल्याच्या आरोपावर अजित पवारांचा पलटवार, म्हणाले ‘मी असले धंदे…’

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये मतदारांना पैसे वाटले असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भातील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

या सर्व आरोपांवर आता स्वतः अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज 7 मे रोजी बारामतीमध्ये मतदान होत आहे. अजित दादा यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत मतदान केलं. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद सांधताना या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

“हा आरोप धांदांत खोटा आहे. त्यांनीच पैसे वाटले असतील. मी असले धंद केले नाहीत. निवडणूक आयोगाने चौकशी करावी”, असं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवारांनी हे आरोप फेटाळत आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरल्याचा पलटवार केला आहे.

मी देखील त्यांनी निवडणूक अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळली आहे, असा आरोप करतो. परंतु मी आरोर देखील करणार नाही. ते काहीपण आरोप करत आहेत. काल रात्री जिल्हा मध्यवर्ती बँक उघडी असल्याचे कोणी पाहिले का? तो व्हिडीओ कालचा होता का? याची कोणी शाहनिशा केली का?, असा प्रतिसवाल यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.

“विरोधकांचं डोकं फिरलंय, त्यांनी..”

पुढे ते म्हणाले की, ” हे काम निवडणूक आयोगाचे आहे. मी तब्बल सात विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. आजपर्यंत मी असे कधी केले नाही आणि यापुढे देखील करणार नाही. कारण नसताना विरोधकांमधील काही बागलबच्चे असे आरोप माझ्यावर करत आहे. मी त्याला कसलंही महत्त्व देत नाही.”

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये पैसे वाटण्यात आल्याचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. आज येथे मतदान पार पडत असताना या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली. बारामतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगणार आहे. यांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होईल.

News Title – Ajit Pawar reply to Rohit Pawar Accusation

महत्त्वाच्या बातम्या-

मतदान केंद्रांवर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली ‘ही’ मोठी भीती, म्हणाल्या…

मोठी बातमी! सुप्रिया सुळे अचानक पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, राजकारणात खळबळ

ड्रेसिंग रूममध्ये जाताच रोहित रडू लागला; चाहत्यांची चिंता वाढली, व्हिडीओ व्हायरल

मोबाईल चोरीला गेल्यास अशाप्रकारे करा Phone Pay, Paytm बंद; अन्यथा बँक खातं होऊ शकतं रिकाम

कोण आहेत त्या 11 जागांवरचे टॉपचे खिलाडी? गड पार करून विजयाची पताका कोण फडकवणार?