“आमच्या 86 वर्षाच्या आईला…”; भाऊ श्रीनिवास पवार पुन्हा अजित पवारांवर बरसले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shrinivas Pawar | बारामतीमध्ये लोकसभेसाठी आज 7 मेरोजी मतदान पार पडत आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी पती अजित पवार यांच्यासोबत सकाळीच मतदान केलं. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी देखील वडील शरद पवार यांच्यासोबत मतदानाचे कर्तव्य बजावले.

अशात अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मतदानाच्या वेळी अजितदादा यांच्यासोबत त्यांच्या आईदेखील उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ‘मेरी माँ मेरे साथ हैं!’ असं म्हटलं. त्यांचा हा डायलॉग अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘दीवार’ सिनेमाशी जोडला जात आहे.

श्रीनिवास पवारांची पुन्हा अजित पवारांवर निशाणा

अजित पवारांच्या ‘मेरी माँ मेरे साथ हैं!’ या डायलॉगवर त्यांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार भाजपसोबत गेल्यापासून डायलॉगबाजी करत आहेत. त्यांनी आमच्या 86 वर्षाच्या आईला राजकारणात ओढायला नको होतं” असं श्रीनिवास पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवारांच्या आईने नेमकी कुणाची बाजू घेतली?, असा सवाल केला जात होता. एकीकडे लेक (अजित पवार)तर दुसरीकडे दीर (शरद पवार) असताना त्यांच्या आईने कुणाची बाजू घेतली, याबाबतही श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी खुलासा केला होता.

अजित दादांच्या आई नेमक्या कुणाच्या बाजूने?

“अजित दादांच्या निर्णयामुळे सर्वच नाराज आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेतला, जो कुणालाच पटला नाही. आईला देखील हे सर्वकाही आवडलं नाही. एका बाजूला लेक तर एका बाजूला दीर असल्याने तिने कोणत्याच बाजूने न राहण्याचा निर्णय घेतला. आई चक्क गाव सोडून पुण्यात माझ्या बहिणीकडे राहिलेली आहे.”, असं श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) म्हणाले होते.

आज अजित पवार यांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली.”माझी आई माझ्याबरोबर आहे. माझी आई कोल्हापूरला होती. माझ्या आत्याच्या मुलाचे लग्न होते. मला तिने सांगितले होते की, मी मतदानाला तुझ्यासोबत येईल. माझी आई माझ्याबरोबर आहे. आमचे कुटुंब फार मोठं आहे. आमच्या विरोधात फक्त तीन कुटुंब आहेत, बाकी कुणी माझ्याविरोधात नव्हते,”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

News Title –  Shrinivas Pawar again target ajit pawar