पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; दररोज 250 रुपयांची बचत बनवेल लखपती!

PPF scheme 2024 

PPF scheme | प्रत्येक व्यक्ती कमाईचा एक हिस्सा भविष्यासाठी बाजूला ठेवत असतो. अडचणीच्या क्षणी हाच पैसा कामी येतो. मात्र, गुंतवून नेमकी कुठे करावी, त्याचा परतावा जास्त असेल की नाही?, याबाबत अनेक प्रश्न पडतातच. अशात बाजारात देखील गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात.

मात्र, सुरक्षेची खात्री आणि भरघोस परतावा मिळेली की नाही, याबाबत साशंकताच असते. आता तुम्हाला सरकारच्या एका अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला लखपती बनवण्याची खात्री देईल. या लेखात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योज योजना

सुरक्षित आणि जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या योजनामध्ये पैसे गुंतवणूक करायचे असतील तर, पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (PPF) अत्यंत फायदेशीर ठरू शकते. दररोज फक्त 250 रुपये या हिशेबानं या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला तब्बल 24 लाख रुपये मिळतील.

व्याजदर किती असणार?

ही गुंतवणूक योजना सरकारी असल्यानं यात तुम्हाला सुरक्षेची हमी मिळते. PPF योजनेतील गुंतवणुकीवर सध्या 7.1 टक्के व्याज दिले जाते. हे व्याज कमी-जास्त होऊ शकते. यासोबतच पोस्ट ऑफिस स्कीममध्ये टॅक्सचे फायदेही मिळतात. या योजनेत दरवर्षी केलेली गुंतवणूक पूर्णपणे करमुक्त राहते. तसंच गुंतवणूकदारांना (PPF scheme) मिळालेल्या व्याजावर तसेच मुदतपूर्तीवर मिळालेल्या निधीवर कोणताही कर भरावा लागत नाही.

24 लाख कसे जमा होतील?

तुम्ही जर या योजनेमध्ये 15 वर्षे गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा निधी हा 24 लाखापर्यंत मिळेल.म्हणजेच जर तुम्ही रोज 250रुपयांची बचत केली तर दरमहा तुमची बचत 7500 रुपये होईल आणि वर्षाला तुम्ही 90,000 सेव कराल. असं तुम्ही 15 वर्षामध्ये 24 लाख पर्यंत गुंतवणू कराल.

15 वर्षांत तुमची एकूण(PPF scheme) जमा 13,50,000 रुपये होईल आणि त्यावर 7.1 टक्के दराने व्याज बघितले तर ते 10,90,926 रुपये होईल आणि मुदत पूर्ण झाल्यावर तुम्हाला 24,40,926 रुपये मिळतील.

योजनेसाठी खाते कसे उघडायचे?

या योजनेत तुम्ही 500 रुपयांमध्ये खाते उघडू शकता आणि दरवर्षी जास्तीत जास्त 1.5लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. परतावा आणि टॅक्स बेनिफिट्स व्यतिरिक्त कर्ज सुविधेचा लाभही (PPF scheme) यामध्ये उपलब्ध आहे. या योजनेत गुंतवणूक अंतर्गत कर्ज तुमच्या ठेव रकमेच्या आधारे दिलं जातं.

News Title –  PPF scheme 2024 
महत्त्वाच्या बातम्या-

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मोठा ट्विस्ट, नारायण राणेंच्या अडचणीत वाढ

हातकणंगलेमध्ये राजकारण तापलं; कार्यकर्त्यांमध्ये तूफान हाणामारी

“अजून कसली वाट बघतोय”; अजित पवारांचा सख्ख्या भावाला थेट इशारा

‘गड किल्ल्यांचं संवर्धन कर्तव्य भावनेतून करणार’; मुरलीधर मोहोळांची ग्वाही

“आमच्या 86 वर्षाच्या आईला…”; भाऊ श्रीनिवास पवार पुन्हा अजित पवारांवर बरसले

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .