कांदा भाजपला रडवणार?; शेतकऱ्याने EVM मशीनवर कांदा ठेवला अन्…

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत आज राज्यातील 11 मतदारसंघांत निवडणूक सुरू आहे. मतदानादरम्यान एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शेतकऱ्याने आपल्यासोबत मतदानासाठी कांदा सोबत नेल्याचं दिसत आहे. त्याने मशीनवर कांदा ठेवला आणि त्यानंतर मतदान केल्याचं पाहायला मिळतंय.

शेतकऱ्यांचा भाजपवर संताप

शेतकऱ्यांना कांद्याने बटन दाबून आपला राग भाजप सरकारवर व्यक्त केला आहे. मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील एका गावातील कांद्याने शेतकऱ्याने मतदान करताना व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालेला आहे.

सरकारने काही महिन्यांपूर्वी कांद्यावर निर्यात बंदी घातली होती. त्यामुळे कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्याने आंदोलनं केली होती. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग भाजपवर नाराज असल्याचं चित्र आहे. याचचा राग शेतकरी निवडणुकीत काढण्याची शक्यता आहे. यामुळे कांदा भाजपला रडवणार असल्याचं बोललं जात आहे.

कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर कांद्याचे दरही घाऊक आणि किरकोळ बाजारात बदलले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याने EVM वर कांदा ठेवून भाजपला नाही तर तुतारीला मतदान केल्याचं दिसत आहे. शेतकऱ्याचा हा व्हिडीओ तुफान चर्चेचा विषय ठरला आहे.

सांगोल्यात EVM मशीन पेटवलं

एका तरुणाने मतदान करताना ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. मतदारकेंद्रावरील संबंधित अधिकाऱ्यांना या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. ईव्हीएम पेटवण्यामागचं नेमकं कारण काय, हे अद्याप समोर आलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

आमदार दत्तात्रेय भरणेंची सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, व्हिडीओ तूफान व्हायरल

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मोठा ट्विस्ट, नारायण राणेंच्या अडचणीत वाढ

हातकणंगलेमध्ये राजकारण तापलं; कार्यकर्त्यांमध्ये तूफान हाणामारी

“अजून कसली वाट बघतोय”; अजित पवारांचा सख्ख्या भावाला थेट इशारा

‘गड किल्ल्यांचं संवर्धन कर्तव्य भावनेतून करणार’; मुरलीधर मोहोळांची ग्वाही