मतदानादिवशीच किरण सामंत गायब?; अखेर उदय सामंतांनी केला मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kiran Samant | रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळत आहे. भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोकणातील ही प्रतिष्ठेची लढत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र अशातच किरण सामंत हे नॉटरिचेबल (Kiran Samant) लागत असल्याची माहिती समोर आली आहे. यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलीये.

Kiran Samant नॉटरिचेबल

मतदानादिवशीच किरण सामंत हे नॉटरिचेबल (Kiran Samant) राहिले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांआधी किरण सामंत आणि शिंदे गटाने या जागेवर दावा केला होता. मात्र भाजपचे नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर काही दिवसांआधी किरण सामंत (Kiran Samant) यांनी आपले बंधू उदय सामंत यांचा फोटो मध्यवर्ती शिवसेना कार्यालयातून काढला आणि किरण सामंत यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान किरण सामंत यांच्या नॉटरिचेबल प्रकरणावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले उदय सामंत?

किरण सामंत नॉटरिचेबल (Kiran Samant Not Reachable) असल्याने कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते किरण सामंत यांना फोनच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते नॉटरिचेबल आहेत. त्यावर उदय सामंत यांनी ते सध्या दुर्गम भागात आहेत. यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. यावर विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उदय सामंत यांनी किरण सामंत हे लांजा येथील दुर्गम भागात असल्याचं सांगितलं. यामुळे त्यांचा फोन हा नॉटरिचेबल लागत असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत. यावर आता नारायण राणे यांचे विरोधक विनायक राऊत यांनी किरण सामंत शांत बसले आहेत म्हणजे काहीतरी इशारा समजावा, असं विनायक राऊत म्हणाले. तर पोलिसांना निवेदन द्या त्यांना संरक्षण द्या, असं विनायक राऊत म्हणाले.

काही दिवसांआधी किरण सामंत आणि उदय सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. मात्र भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्यावर आपली भूमिका व्यक्त केली होती. त्यानंतर किरण सामंत आणि उदय सामंत यांनी एक पाऊल मागे घेत नारायण राणे यांना पाठिंबा दिला होता.

दरम्यान, किरण सामंत आणि उदय सामंत यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. यामुळे नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी नारायण राणे यांच्या बाजूने शिंदे गटाची मतं कशी वळवता येईल याची जबाबदारी उदय सामंत आणि किरण सामंत या दोन्ही भावांवर दिली होती.

News Title – Kiran Samant Not Reachable After Uday Samant Replied

महत्त्वाच्या बातम्या

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मोठा ट्विस्ट, नारायण राणेंच्या अडचणीत वाढ

हातकणंगलेमध्ये राजकारण तापलं; कार्यकर्त्यांमध्ये तूफान हाणामारी

“अजून कसली वाट बघतोय”; अजित पवारांचा सख्ख्या भावाला थेट इशारा

‘गड किल्ल्यांचं संवर्धन कर्तव्य भावनेतून करणार’; मुरलीधर मोहोळांची ग्वाही

“आमच्या 86 वर्षाच्या आईला…”; भाऊ श्रीनिवास पवार पुन्हा अजित पवारांवर बरसले