अस्सल केशर कसं ओळखणार?; फॉलो करा ‘या’ टिप्स

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Tips to Identify Real Kesar | बाजारात केशर प्रचंड महाग विकले जाते. केशर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. केशर अनेक खाद्य पदार्थांमध्ये वापरलं जाते. मुख्यतः मिठाईमध्ये याचा अधिक वापर होतो. लहान मुलांना दुधात केशर टाकून दिल्यास त्याचे खूप फायदे दिसतात.

मात्र, बाजारात आजच्या घडीला प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ दिसून येते. त्यामुळे बाजारात नकली केशर देखील मोठ्या प्रमाणात विक्री होते. केशर खूप महाग असल्याने ते विकत घेण्यासाठू पैसेही अधिक मोजावे लागतात. मात्र, जर ते नकली निघाले तर, त्याचा संताप होतो. शिवाय पैसेही वाया जातात.

आता तुम्हाला केशर असली आहे की नकली, ते ओळखायचे असेल (Tips to Identify Real Kesar) तर ते शक्य आहे. तुम्ही घरीच बाजारातून आणलेले केशर अस्सल आहे की नाही याचा तपास करू शकता. या लेखात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

‘असं’ ओळखा बनावट केशर

रंग तपासा : अस्सल केशरचा रंग हा केशरी असतो. त्यामुळे केशर पाण्यात टाकल्यावर पाण्याला हलकासा पिवळसर रंग येतो. जर केशर पाण्यात टाकल्यावर पाणी पिवळ्या रंगाचे झालेतर ते असली केशर समजावं. जर पाण्याला डार्क लाल किंवा केशरी रंग आला तर केशर बनावट आहे.

सुगंध तपासा : असली केशरला मंद गोडसर सुगंध येतो. पण, जर केशराला कडवट किंवा डार्क वास येत असेल तर ते बनावट केशर आहे असं समजावं.

पाणी किंवा बेकिंग सोडा : एका पातेल्यात (Tips to Identify Real Kesar) बेकिंग सोडा आणि पाणी यांची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये केसरच्या दोन काड्या टाका. जर या मिश्रणाचा रंग लाल किंवा केशरी आला तर ते बनावट आणि मिश्रणाला जर पिवळा रंग आला तर ते असली केशर असल्याचं सिद्ध होईल.

चव : असली केशरचा सुगंध जरी गोड असला तरीदेखील त्याची चव कडवट असते. त्यामुळे केशर खरेदी केल्यानंतर त्याच्या १-२ काड्या चावून पाहाव्यात. गोड लागलं तर ते केशर बनावट आहे.

News Title – Tips to Identify Real Kesar 

महत्त्वाच्या बातम्या-

आमदार दत्तात्रेय भरणेंची सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, व्हिडीओ तूफान व्हायरल

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मोठा ट्विस्ट, नारायण राणेंच्या अडचणीत वाढ

हातकणंगलेमध्ये राजकारण तापलं; कार्यकर्त्यांमध्ये तूफान हाणामारी

“अजून कसली वाट बघतोय”; अजित पवारांचा सख्ख्या भावाला थेट इशारा

‘गड किल्ल्यांचं संवर्धन कर्तव्य भावनेतून करणार’; मुरलीधर मोहोळांची ग्वाही