राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे कारण?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati News | बारामती लोकसभा मतदारसंघाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे त्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे बारामतीची निवडणूक चांगलीच रंगतदार बनली आहे.

बारामतीच्या (Baramati News) निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज (मंगळवार) मतदानाच्या दिवशी चांगलाच राडा पहायला मिळत आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाकडून पैशांचा पाऊस पाडल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या धक्कादायक आरोपांवर अजित पवार चांगलेच संतापले आहेत. आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

नेमका काय प्रकार घडला आहे?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मतदानाच्या दिवशी केलेल्या कृतीनं वाद निर्माण झाला आहे. त्यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. रुपाली चाकणकर यांच्या या कृतीमुळे त्यांच्या विरोधात थेट पोलिसात तक्रार दाखल  करण्यात आली आहे, त्यामुळे रुपाली चाकणकर नव्या संकटात सापडल्या आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या खडकवासाला परिसरात राहतात. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या आज सकाळी जवळच्या मतदान केंद्रावर पोहचल्या. मतदान सुरु होण्यापूर्वीच त्यांनी औक्षणाचं ताट ताट घेऊन थेट मतदान केंद्रात प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनची पूजा केली. हीच गोष्ट आता वादात सापडली आहे.

चाकणकरांच्या अडचणी वाढणार?

EVM मशीनचं औक्षण करतानाचा व्हिडीओ रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Rupali Chakankar EVM Video) झाला. त्यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईव्हीएमसोबत अशा प्रकारची कृती करणं योग्य नाही. ईव्हीएमसोबत छेडछाड करणं कायद्यानं गुन्हा आहे, त्यामुळे अशा प्रकरणात निवडणूक आयोग काय भूमिका घेतो?, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीची (Baramati News) लढाई प्रतीष्ठेची केली आहे. खडकवासल्यातून सुनेत्रा पवार यांना लीड देण्याची जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्यासह काही नेत्यांवर आहे, त्यामुळे या भागात रुपाली चाकणकर यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती, मात्र आपल्या एका कृतीमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

News Title: Baramati News Rupali Chakankar EVM Video

महत्त्वाच्या बातम्या-

मतदानादिवशीच किरण सामंत गायब?; अखेर उदय सामंतांनी केला मोठा खुलासा

कांदा भाजपला रडवणार?; शेतकऱ्याने EVM मशीनवर कांदा ठेवला अन्…

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; दररोज 250 रुपयांची बचत बनवेल लखपती!

आमदार दत्तात्रेय भरणेंची सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, व्हिडीओ तूफान व्हायरल

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मोठा ट्विस्ट, नारायण राणेंच्या अडचणीत वाढ