सोशल मीडियावर फक्त श्रीरंग बारणेंचा बोलबाला, निकालाआधीच ‘या’ बाबतीत वाघेरेंनी सपशेल हात टेकले!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pimpri Chinchwad | लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील चौथ्या टप्प्यातील मावळ लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. याआधी झालेल्या गावभेटी, दौरे, शहरातील रॅल्या, गल्ली बोळातील प्रचारफेऱ्या, गाड्यांच्या फेऱ्या, कर्णे आणि साऊंडचा दणदणाट यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा अगदी धुरळा उडून गेलाय. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंनी प्रचाराचा जोर जवळपास सारखाच दिसतोय. त्यामुळे अंतिम टप्प्यात जिथे प्रमुख नेत्यांच्या सभांनी मैदाने गाजणार, तेव्हा मावळ लोकसभेचे (Maval Loksabha) चित्र बऱ्यापैकी बदलू शकते किंवा स्पष्ट होऊ शकते. ग्राउंडवरील प्रचारात मविआ आणि महायुती हे कमी अधिक प्रमाणात समानतेकडे असले तरी, एका बाबतीत मात्र श्रीरंग बारणेंनी प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरेंना अगदीच धोबीपछाड दिली आहे.

मोदींच्या यशात सोशल मीडियाचा मोठा वाटा-

2014 साल हे सर्वांच्याच लक्षात राहणारे आहे. 60 वर्षांची काँग्रेसची एकहाती सत्ता उलथून टाकत, भाजपा प्रणित एनडीए सरकार देशात सत्तेवर आले. केंद्रात एनडीएचे सरकार आले तरीही ते सरकार होते, फक्त एकाच चेहऱ्याचे आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी. 2014 पर्यंत फक्त गुजरात या एका राज्यापुरते, भाजपा या एका पक्षापुरते आणि काही क्षेत्रापूरते मर्यादीत असलेले नरेंद्र मोदी 2013 ते 2014 या एका वर्षात देशाचे आणि जागतिक स्तराचे नेते बनले. नेते बनले तेही साधेसुधे नाही तर पुढील दहा वर्षात मोदी हेच धोरण आणि मोदी सांगतील ते तोरण… अशी प्रतिमा मोदींची बनली. (Pimpri Chinchwad)

Pimpri Chinchwad

मोदींच्या या प्रतिमानिर्मितीत आणि भाजपाच्या प्रतिमा संवर्धनात सर्वात मोठा हात कुणाचा असेल तर तो होतो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा. स्वतः मोदींनीही हे सत्य अनेकदा मान्य केलंय आणि भाजपा 2013 पासून आजतागायत या गोष्टीली खुप सिरियस घेत आलंय. इतकी वर्षे मोदी सरकारमध्ये राहिलेल्यामुळे आणि एनडीएचं राजकारण जवळून पाहिल्यामुळे मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी देखील या गोष्टीला अत्यंत महत्व दिल्याचं दिसतंय. (Pimpri Chinchwad)

बारणेंनी जाणली सोशल मीडियाची ताकद-

pcmc news: तब्बल 29 वर्षांच्या राजकीय आयुष्यात अनेक निवडणूका लढलेले आणि सलग दोन टर्म खासदार राहिलेले श्रीरंग आप्पा बारणे (Pimpri Chinchwad) आता तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासोबत निवडणूका, प्रचार यांबाबत अनुभवाची मोठी शिदोरी आहे, आणि ही शिदोरी सध्या बारणे आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराविरोधात पुरेपूर वापरत आहेत. बारणे एनडीए सोबत होते. त्यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचे राजकारण जवळून पाहिलंय, अनुभवलंय. त्यामुळे सोशल मीडिया, ऑनलाईन मीडियाची ताकद त्यांना पुरेपूर माहिती आहे. म्हणूनच आपल्या तिसऱ्या उमेदवारीच्या काळात ते या सर्व घटकांचा अगदी योग्य पद्धतीने वापर करताना दिसतायेत. दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार (Sanjog Waghere) मात्र या आघाडीवर पूरेपूर फेल झालेले दिसतात.

फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सअप ही सोशल मीडिया तसेच इन्स्टंट मेसेंजिंगमधील काही प्रमुख उदाहरणे आहेत. आपण प्रत्येकजण रोजच्या आयुष्यात कधी ना कधी यापैकी एक किंवा सर्वच प्लॅटफॉर्मवर एकदातरी हजेरी लावतो. एका रिपोर्टप्रमाणे आपल्या देशात सर्वात जास्त तरूण आहेत, आणि ते इन्स्टाग्रामचा वापर सर्वाधिक करतात. तसेच आता अलीकडे ऑनलाईन जगात कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हा रिल्स/श़ॉर्ट किंवा व्हिडिओ पाहण्याला प्राधान्य देतो. सोशल मीडियातून मिळणारे ज्ञान हे खरे की खोटे किंवा आभासी जगात वावरताना समोर दिसतंय ते खरे की खोटे हे चाचपडत बसण्याचा वेळ तिथे वापरकर्त्यांना नसतो, त्यामुळे दिसेल ते खरे मानण्याची सवय अपोआप लागते. यातूनच मत बनवण्याची प्रक्रियाही होत असते. याच घटकाचा वापर करून प्रचारही करता येतो, हे भाजपा मोदी सरकारने हेरलं आणि त्याचा वापर करून दाखवला. अगदी हेच जसंच्या तसं श्रीरंग बारणे त्यांच्या प्रचारादरम्यान (Pimpri Chinchwad) करताना दिसत आहेत.

Shrirang Barne 1

सोशल मीडिया पूरेपूर वापरणारे बारणे एकटेच-

मावळ लोकसभेत (Pimpri Chinchwad) असलेल्या 33 उमेदवारांमध्ये सर्वच्या सर्व प्रमुख सोशल मीडिया हॅन्डल्स वापर करणारे आणि एक्टिव्हली त्यावर कंटेट पोस्ट करणारे बारणे हे एकमेव उमेदवार आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी याबाबत कित्येकपटींनी मागे आहेत. मावळ लोकसभेत (Pimpri Chinchwad) असणारे निर्णायक नवमतदार यामुळे बारणेंच्या पाठीशी उभे राहतील, असा एक अंदाज आहे. त्यासोबतच प्रत्येक सभा, बैठका, रॅल्या, प्रचार फेऱ्या, नेत्यांची भाषणे यांचे योग्य कंटेंट तयार करून सर्व प्रकारांत आणि सर्व माध्यमांवर बारणे यांची टीम जलदगतीने पोहचवत असते. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या श्रीरंग बारणे यांचाच जोराचा बोलबाला असलेला दिसून येतो. आता सोशल मीडियातील हे वातावरण बारणेंच्या बाजूनी किती मतदार फिरवणार की हे देखील फक्त आभासी राहणार, हे मतदान आणि निवडणूकीतून दिसलेच. पण इतर उमेदवारांना आणि खासकरून संजोग वाघेरे यांना इथे तरी बारणेंनी चीत केल्याचे दिसतंय.

सोशल मीडियाच्या जोरावर नरेंद्र मोदींनी देशात सत्ता खेचून आणली. आजही त्यांच्याइतका प्रभावी सोशल मीडियाचा वापर विरोधकांना जमत नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणेंनी याच सोशल मीडियाचा प्रभावी वापर केलाय. फेसबुक, इस्टाग्राम, ट्विटर यासारख्या माध्यमांवर ते सक्रीय आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे सोशल मीडियाचा प्रभावी वापर करताना दिसत नाहीत. त्यांचं ट्विटर अकाऊंट तर बंदच आहे. सोशल मीडिया नवमतदारांना नक्कीच प्रभावित करु शकतो, यामुळे काही टक्के मतं जरी प्रभावित झाली तरी ती निर्णायक ठरु शकतात. या आघाडीवर संजोग वाघेरे सपशेल अपयशी ठरले आहेत. याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागू शकते.

News Title: Pimpri Chinchwad Shrirang Barne social media

महत्त्वाच्या बातम्या-

मतदानादिवशीच किरण सामंत गायब?; अखेर उदय सामंतांनी केला मोठा खुलासा

कांदा भाजपला रडवणार?; शेतकऱ्याने EVM मशीनवर कांदा ठेवला अन्…

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; दररोज 250 रुपयांची बचत बनवेल लखपती!

आमदार दत्तात्रेय भरणेंची सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, व्हिडीओ तूफान व्हायरल

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मोठा ट्विस्ट, नारायण राणेंच्या अडचणीत वाढ