वृषभ, कन्येसाहित ‘या’ राशींना बक्कळ पैसे कमावण्याची संधी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Today Horoscope l मेष:- तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. सरकारी कामे मार्गी लागतील. कामातील बदल जाणून घ्यावेत. मौल्यवान वस्तू जपून ठेवाव्यात. आवडीचे पदार्थ चाखाल. शुभ अंक २, शुभ रंग विटकरी

वृषभ:- जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. साहित्याची आवड जोपासता येईल. भावंडांना बाहेर गावी जाण्याचं योग येईल. मैत्रीतील आपुलकी वाढेल. फार दूरचे विचार करू नका. आर्थिक गोष्टी मार्गी लागतील. शुभ अंक ४, शुभ रंग जांभळा

मिथुन:- क्षणिक सौख्याचा आनंद घ्याल. मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने मार्गक्रमण कराल. व्यापारात चांगला लाभ होईल. कमिशनचा लाभ उठवावा. शुभ अंक १, शुभ रंग पांढरा

कर्क:- स्त्री वर्गाचा सहवास लाभेल. नवीन मित्रा जोडले जातील. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. शुभ अंक ८, शुभ रंग पोपटी

सिंह:- घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. तुमच्या कलागुणांचे कौतुक केले जाईल. महिलावर्ग मनाजोगी खरेदी करेल. चांगले साहित्य वाचनात येईल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. शुभ अंक ३, शुभ रंग जांभळा

Today Horoscope l कन्या:- चारचौघांत तुमची कला सादर करता येईल. योग्य विचारांची जोड घ्यावी. धार्मिक साहित्य वाचाल. इतरांना मनापासून मदत कराल. मनात नवीन कल्पना रुजतील. आर्थिक धनलाभ संभवतो. शुभ अंक ५, शुभ रंग गुलाबी

तूळ:- अचानक धनलाभ संभवतो. लॉटरीचे तिकीट घ्याल. घरगुती प्रश्न समजून घ्यावेत. अपचनाचा त्रास जाणवेल. हातातील कामे पूर्ण होतील. शुभ अंक ६, शुभ रंग निळा

वृश्चिक:- पत्नीचे प्रेमळ सौख्य लाभेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. कामातून आत्मिक समाधान लाभेल. व्यवसाय वृद्धीचा मार्ग आखावा. मुलांचा खोडकरपणा वाढेल. शुभ अंक ७, शुभ रंग लाल

धनू:- कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल. बोलण्याचा भरात नवीन जबाबदारी अंगावर घ्याल. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल. जुगाराची आवड जोपासाल. शुभ अंक ९, शुभ रंग पोपटी

Today Horoscope l मकर:- पित्ताचा विकार जाणवेल. कामाचा फार ताण घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. स्वत: मध्ये काही बदल करून पहावेत. कामातील अडथळे प्रयत्नपूर्वक दूर करावेत. शुभ अंक २, शुभ रंग गुलाबी

कुंभ:- सामाजिक बांधीलकी जपावी. वादावादीत सहभाग घेऊ नका. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. धाडसाने कामे पूर्ण कराल. तुमची हिंमत वाढीस लागेल. केलेल्या कामाचा मोबदला मिळेल. शुभ अंक ३, शुभ रंग पिवळा

मीन:- मित्रांचा रोष वाढवून घेऊ नका. अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. मानसिक चंचलता जाणवेल. शुभ अंक ९, शुभ रंग विटकरी

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

बारामती संपताच शरद पवारांचं ‘मिशन शिरुर’, आढळराव पाटलांचं गणित बिघडणार?

पैसे खिशात टिकत नसतील तर करा ‘हा’ उपाय

बारामतीच्या लढाईत मोठा ट्विस्ट, रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ

सोशल मीडियावर फक्त श्रीरंग बारणेंचा बोलबाला, निकालाआधीच ‘या’ बाबतीत वाघेरेंनी सपशेल हात टेकले!

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे कारण?