पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार! ‘या’ दिवशी पावसाची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune Weather Update | पुण्यासह राज्यात जवळपास सर्वच भागामध्ये तापमान प्रचंड वाढलंय. पुण्यात मागील काही दिवसांपासून  पारा वाढतच चालला आहे. येथे तापमान 43 अंशांवर गेलं होतं. यामुळे उकाडा प्रचंड वाढला आहे. येत्या काही दिवसांत येथे वातावरणमध्ये बदलाव होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार, 8 ते 11 मे दरम्यान पुण्यात दुपार आणि संध्याकाळच्या वेळेत आकाश मुख्यत: स्वच्छ आणि हळूहळू अंशतः ढगाळ होईल. 12 आणि 13 मे रोजी हवामानाला वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अंशत: ढगाळ वातावरणामुळे वादळी वारे, वीज आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यात वातावरणात बदल होणार

पुण्यामध्ये हवामानातील या बदलामुळे (Pune Weather Update) सध्याच्या उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्याता देखील वर्तवण्यात आली आहे. यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

एप्रिल महिन्यात तापमान अधिक वाढल्याचं दिसून आलं. त्यामुळे रात्री देखील उकाड्याचा त्रास झाला. आता येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात कसं राहणार वातावरण?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र व विदर्भात पुढील तीन दिवस म्हणजेच 8, 9, 10 मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोडी, गोंदिया, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर, मराठवाड्यात आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच 11 मे पर्यंत मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

News Title –  Pune Weather Update news