निवडणुकीच्या रणधुमाळीत पेट्रोल-डिझेलचे दर घसरले?; नवीन अपडेट समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Petrol-Diesel Price Today | देशासह महाराष्ट्रात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या काळात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा कालच तिसरा टप्पा पार पडला. आता लवकरच चौथा टप्पा देखील पार पडेल.

या काळात इंधन दरामध्ये काही बदलाव झाले की नाही, याबाबत नवीन अपडेट समोर आली. महाराष्ट्र सह देशात कुठेच इंधन दरामध्ये कपात करण्यात आली नाही. सगळीकडे दर जवळपास सारखेच आहेत. महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांचा आलेख बघता पेट्रोलची सरासरी किंमत 104.83 रुपये प्रतिलिटर आहे.

महाराष्ट्रातील आजचे इंधनदर काय?

राज्यात पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असल्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, हे घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय (Petrol-Diesel Price Today) कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

आज 8 मे रोजी राज्यात पेट्रोलची सरासरी किंमत 104.83 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, गेल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 105.00 रुपये प्रति लिटर होती, त्या तुलनेत आता किंमत 0.17 टक्क्यांनी कमी झाली आहे.
आज राज्यात पेट्रोल 104.83 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर, डिझेलचे दर 91.40 रुपये प्रति लिटर आहे.त्यामुळे वाहनचालकांना इंधन दरात जराही दिलासा मिळाला नाही.

महानगरांमधील इंधनदर

मुंबईत आज पेट्रोलचा दर 104.21 रुपये आणि डिझेलचा दर 92.15 रुपये प्रतिलिटर आहे.
कोलकातामध्ये आज पेट्रोलचा दर 103.94 रुपये आणि डिझेलचा दर 90.76 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईत आज पेट्रोलचा दर 100.85 रुपये आणि डिझेलचा दर 92.43 रुपये प्रति लिटर आहे.
राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 94.76 रुपये आणि डिझेलची किंमत 87.66 रुपये प्रति लीटर आहे.

News Title- Petrol-Diesel Price Today 8 May 2024

महत्त्वाच्या बातम्या –

पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार! ‘या’ दिवशी पावसाची शक्यता

अजित पवारांची धाकधूक वाढली; शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट

या अक्षय तृतीयेला दणक्यात घरी आणा टोयोटा कंपनीची नवी कोरी कार; किंमत काय?

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर अखेर शिक्कामोर्तब!

राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरु; जाणून घ्या पुढील तीन दिवस हवामान कसं असेल