अजित पवारांची धाकधूक वाढली; शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | राज्यातील बहुचर्चित शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सुनेत्रा पवार आणि इतर आरोपींना मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे शाखेने दिलासा दिला. या घोटाळ्या प्रकरणी कोणतेच पुरावे नसल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

Ajit Pawar यांची धाकधूक वाढली

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. यामुळे अजित पवारांच्या (Ajit Pawar) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवारांवर पुन्हा चौकशीची टांगती तलवार आहे.

SIT चौकशीची मागणी

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला असला, तरी दुसऱ्या खंडपीठापुढे दाद मागण्याचे याचिकाकर्त्यांना निर्देश दिले आहेत.

जानेवारी 2024 मध्ये हा क्लोजर रिपोर्ट दाखल करण्या आला असला, तरी अद्याप मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं स्वीकारलेला नाही. या क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे, शालिनीताई पाटील तसेच अन्य तक्रारदारांनी विरोध करत पीटीशन कोर्टात सादर केली होती. मात्र, मूळ तक्रारदार सुरेंद्र मोहन अरोरा यांच्याशिवाय अन्य कुणाचीही विरोध याचिका स्वीकारण्यास नकार दिला होता.

शिखर बँकेकडून सहकारी साखर कारखाने, सुतगिरण्या आणि राज्यातील इतर सहकारी संस्थांना हजारो कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आलं होतं. त्यामध्ये घोटाळा झाल्याचे आरोप झाले आहेत. सहकार आयुक्तांनी शिखर बँकेची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीशांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती देखील केली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर अखेर शिक्कामोर्तब!

राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरु; जाणून घ्या पुढील तीन दिवस हवामान कसं असेल

आज औरंगाबाद-उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतरावर अंतिम फैसला होणार! निकालाकडे राज्याचं लक्ष

शेअर बाजारात घसरण; तरीही ‘हा’ शेयर तुम्हाला करणार लखपती

‘या’ तरुणाने केला मुख्यमंत्र्यांचा पाठलाग; नेमकं यामागचं कारण काय?