‘शरद पवारांचा भाजपच्या बड्या नेत्याला फोन’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prakash Ambedkar | बारामती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने सुप्रिया सुळे यांना पाठींबा दिला होता. मात्र आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीच शरद पवार यांनी भाजपच्या बड्या नेत्याला फोन केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना पाठींबा दिला होता. मात्र आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शरद पवार यांना सवाल केला आहे. शरद पवार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना फोन का केला?, असा सवाल केला आहे.

निवडणूक सुरू असताना कोणी फोन करतं का?, असा प्रश्न त्यांनी केला आहे. आजारी असल्यावर कोणी फोन करतं का?, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राजनाथ सिंह यांना चार दिवसांआधी तुमचा फोन झाला तेव्हा तुमचं काय बोलणं झालं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राष्ट्रवादीच्या पाच जागांसंबधीत चर्चा झाली का? एकनाथ शिंदे हे मुंबईच्या तीन जागांवर लढत देत आहेत. त्याबाबत फोन केला होता का?, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांच्या जागांबाबत बोलणं झालं का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी केला.

सुप्रिया सुळे यांना पाठींबा दिला

दरम्यान त्यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांना पाठींबा दिला असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आम्ही सुप्रिया सुळे यांना बारामतीतून पाठींबा दिला आहे. आम्ही आमचा उमेदवार दिला नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे यांना विजयासाठी काम करायला सांगितलं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर राजनाथ सिंह यांना फोन केल्याचा आरोप केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर शरद पवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर काय प्रत्युत्तर देतील हे पाहणं गरजेचं आहे.

News Title – Prakash Ambedkar Say To Sharad Pawar Call To Rajnath Singh

महत्त्वाच्या बातम्या

सोशल मीडियावर फक्त श्रीरंग बारणेंचा बोलबाला, निकालाआधीच ‘या’ बाबतीत वाघेरेंनी सपशेल हात टेकले!

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे कारण?

अस्सल केशर कसं ओळखणार?; फॉलो करा ‘या’ टिप्स

मतदानादिवशीच किरण सामंत गायब?; अखेर उदय सामंतांनी केला मोठा खुलासा

कांदा भाजपला रडवणार?; शेतकऱ्याने EVM मशीनवर कांदा ठेवला अन्…