अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोनं झालं स्वस्त?; नवीन किंमती आल्या समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold-Silver Rate Today | अक्षय्य तृतीयेचा सण आता दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात बरेच जण सोनं खरेदी करत असतात. मात्र, ग्राहकांना त्यापूर्वीच मोठा फटका बसला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मौल्यवान धातूच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सराफा बाजारात गर्दीच दिसून येत नाहीये.

गेल्या दोन महिन्यांमध्ये सोने-चांदीचे दर गगनाला भिडले होते. या महिन्यांत दरवाढीचे अनेक विक्रम तुटले.तर, मे महिन्याच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच यामध्ये चढउतार दिसून येत आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेआधी सोन्या-चांदीची खरेदी करावी की नाही?, असा प्रश्न पडला आहे.

या आठवड्यात 6 मे रोजी सोने 200 रुपयांनी सोने वधारले. तर 7 मे रोजी 330 रुपयांनी किंमती वाढल्या. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 66,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचे भाव सुसाट

गेल्या आठवड्यामध्ये चांदीत नरमाईचे सत्र होते. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने दोन हजारांची भरारी घेतली. पहिल्याच दिवशीच चांदीने 1 हजार रुपयांची दरवाढ नोंदवली. तर 7 मे रोजी एक हजारांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,000 रुपये आहे.

कॅरेटचा भाव ‘असा’ असेल

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 71,668 रुपये, 23 कॅरेट 71,381रुपये, 22 कॅरेट सोने 65,648 रुपये झाले. 18 कॅरेट 53,751 रुपये, 14 कॅरेट सोने 41,926 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय (Gold-Silver Rate Today) बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title : Gold-Silver Rate Today 8 May 2024

महत्त्वाच्या बातम्या-

निवडणुकीच्या रणधुमाळीत पेट्रोल-डिझेलचे दर घसरले?; नवीन अपडेट समोर

पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार! ‘या’ दिवशी पावसाची शक्यता

अजित पवारांची धाकधूक वाढली; शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट

या अक्षय तृतीयेला दणक्यात घरी आणा टोयोटा कंपनीची नवी कोरी कार; किंमत काय?

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर अखेर शिक्कामोर्तब!