“एकनाथ शिंदेंना 2013 मध्येच शिवसेना संपवायची होती, 4 आमदारांसह…”; राजन विचारेंचा मोठा दावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rajan Vichare | राज्यात सध्या ठाण्याचा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. येथे महायुतीकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नरेश म्हस्के यांच्या विरोधात ठाकरे गटाचे राजन विचारे निवडणुकीत उभे राहिले आहेत.

अशात राजन विचारे सतत शिंदे गटावर निशाणा साधताना दिसून येत आहेत. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन नरेश म्हस्केंबाबत मोठा गोप्यस्फोट केला होता. आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.

शिंदे यांना खरं तर 2013 मध्येच काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा होता. कुठल्या पक्षाशी तुम्ही प्रामाणिक राहिलात? स्वत:सह मिळून पाच आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा दावाच महाविकास आघाडीचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांनी केला आहे. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाले राजन विचारे?

एकनाथ शिंदे हे 2013 सालीच बंडखोरी करणार होते. त्यांना तेव्हाच शिवसेना संपवायची होती. तुम्ही काय पक्ष वाढवला? जिल्ह्यात किती आमदार होते? सेटिंग करत राहिलात, याला फोडं, त्याला फोडं, कुठला पक्ष सोडलात सांगा?, अशा शब्दात राजन विचारे (Rajan Vichare) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

इतकंच नाही तर, एकनाथ शिंदे 2013 मध्येच चार आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र त्यावेळी आम्ही काँग्रेसच्या तिकीटावर कसे निवडून येणार? असं चार आमदारांनी विचारलं, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं बंड फसलं, असा मोठा गौप्यस्फोटही राजन विचारे यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.

कॉँग्रेस नेत्याचाही विचारेंच्या दाव्याला दुजोरा

अशात काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा राजन विचारे (Rajan Vichare) यांच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. “2013 साली एकनाथ शिंदे पाच आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मी असं ऐकलं होतं” असं विजय वेडट्टीवार म्हणाले आहेत. त्यामुळे हा नवीन मुद्दा आता चर्चेत आला आहे.

News Title – Rajan Vichare big revelation about Eknath Shinde  

महत्त्वाच्या बातम्या-

अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोनं झालं स्वस्त?; नवीन किंमती आल्या समोर

‘शरद पवारांचा भाजपच्या बड्या नेत्याला फोन’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

निवडणुकीच्या रणधुमाळीत पेट्रोल-डिझेलचे दर घसरले?; नवीन अपडेट समोर

पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार! ‘या’ दिवशी पावसाची शक्यता

अजित पवारांची धाकधूक वाढली; शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट