मतदान झाल्यानंतर बारामती मतदारसंघात घडला धक्कादायक प्रकार, सगळीकडे एकच खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Crime News। बारामती लोकसभा मतदारसंघाकडे केवळ राज्य नाहीतर देशाचं लक्ष लागलंय. काल बारामती मतदारसंघात मतदान झालं. मतदानानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात धक्कादायक प्रकार घडला. वारजे माळवाडी भागात गोळीबार झाला. (Crime News)

बारामती मतदारसंघात गोळीबार

वारजे माळवाडी भागात रामनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हवेत केलेल्या गोळीबार केल्याची घटना 10:30 वाजता घडली आहे. याघटनेमुळे खळबळ उडाली आहे. घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. (Crime News)

पुण्यात गुन्हेगारीत वाढ

पुणे शहरामध्ये गुन्हेगारी (Crime News) वाढली आहे. किरकोळ कारणामुळे कोयते हल्ले झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गोळीबार केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराचा वारजे भाग हा बारामती लोकसभा मतदारसंघात येत आहे. येथेच काल रात्री मतदान झाल्यानंतर गोळीबार करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. (Crime News)

घडलेल्या घटनेमुळे वारजे परिसरात शांतता पसरली आहे. आरोपींनी गोळीबार केल्यानंतर मुंबई-पुणे हायवेवरून कात्रजकडे पळ काढला. आरोपींनी गोळीबार का केला असवा? यामागील ठोस कारण अद्यापही समोर आलं नाही. मात्र गोळीबारामुळे वारजे माळवाडी परिसरात भीतीचं वातावरण आहे.

मागील काही दिवसांमध्ये पुण्यात लगातार गुन्हेगारी वाढली आहे. जंगली महाराज रोडवर जंगली महाराज रोडवर एका व्यावसायिकावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर हडपसर येथे  गोळीबाराची घटना घडलेली. तर काही दिवसांआधी एका मुलीने प्रेमासाठी नकार दिल्याने युवकाने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

News Title – Crime News In Baramati Loksabha Warje Malwadi

महत्त्वाच्या बातम्या

शेअर बाजारात घसरण; तरीही ‘हा’ शेयर तुम्हाला करणार लखपती

‘या’ तरुणाने केला मुख्यमंत्र्यांचा पाठलाग; नेमकं यामागचं कारण काय?

कोव्हीशील्ड लसी संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी समोर

वृषभ, कन्येसाहित ‘या’ राशींना बक्कळ पैसे कमावण्याची संधी

बारामती संपताच शरद पवारांचं ‘मिशन शिरुर’, आढळराव पाटलांचं गणित बिघडणार?