अजित पवार संतापले, भाजप जिल्हाध्यक्षाला खाली बसवलं; शिवाजी आढळरावांनी मागितली माफी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur Loksbha Election 2024) महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॅा. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यात चांगलीच काट्याची लढाई होणार असल्याचं दिसत आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सुरु आहे. घोडेगावात आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी महायुतीच्या नेत्यांवर अजित पवार संतापल्याचं पहायला मिळालं.

नेमका काय प्रकार घडला?

राजकीय सभा असली की नेत्यांना चांगलाच चेव चढतो, प्रत्येकाला भाषण करायचं असतं. घोडेगावात आयोजित सभेमध्ये सुद्धा महायुतीच्या नेत्यांची एकापाठोपाठ भाषण सुरूच होती. अजित पवार यांना कुठंतरी हे मान्य नव्हतं, यावरून अजित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना चांगलंच सुनावलं.

या सभेत भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या भाषणाची वेळ आली, तेव्हा हा प्रकार घडला. अजित पवार चांगलेच संतापलेले पहायला मिळाले, त्यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर भाषण न करताच खाली बसण्याची वेळ आली. या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरु झाली होती.

Pune News | नेमकं काय म्हणाले अजित पवार?

नेत्यांची एकापाठोपाठ एक भाषणं सुरु असल्याचं पाहून अजित पवारांना राग अनावर झाला. ‘मला दिवसभर सभा घ्यायच्या आहेत. हे काय सुरु आहे? मला दिवसभर सभा घ्यायच्या आहेत, हे बरोबर नाही.’ असं अजित पवार यांनी आपली नाराजी जाहीरपणे प्रकट केली.

अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करताच लगेचच बाकीी सर्व भाषणं थांबवण्यात आली. शिरुर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील स्वत: भाषणासाठी उभे राहिले. झालेल्या प्रकाराबद्दल तसेच ज्यांना भाषणाची संधी मिळाली नाही त्यांची त्यांनी माफी मागितली.

दरम्यान, अजित पवार यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे. या पक्षाला बोलू द्या, त्या पक्षाला बोलू द्या, महायुती असल्यानं हे बऱ्याच ठिकाणी घडतं. पण सर्वांनी जरा वेळेचं भान ठेवलं पाहिजे, सध्या प्रचाराला वेळ कमी आहे, त्यामुळं मी जिथं सभेला जातो तिथं उमेदवार आणि फक्त मीच बोलतो. मगाशी एक-एक जण भाषणाला उभं राहायला लागले. महायुती असल्यानं असं घडतं, पण अरे बाबांनो जरा वेळ बघा, असं म्हणत अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र झालेल्या प्रकाराची आता मतदारसंघात एकच चर्चा सुरु झाली आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा अपमान झाल्याचा मुद्दा खासगीत बोलून दाखवला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मतदान झाल्यानंतर बारामती मतदारसंघात घडला धक्कादायक प्रकार, सगळीकडे एकच खळबळ

“एकनाथ शिंदेंना 2013 मध्येच शिवसेना संपवायची होती, 4 आमदारांसह…”; राजन विचारेंचा मोठा दावा

अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोनं झालं स्वस्त?; नवीन किंमती आल्या समोर

‘शरद पवारांचा भाजपच्या बड्या नेत्याला फोन’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

निवडणुकीच्या रणधुमाळीत पेट्रोल-डिझेलचे दर घसरले?; नवीन अपडेट समोर