Ranveer Singh and Deepika Padukone | अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच बाळाला जन्म देणार आहे. दीपिका आणि रणवीर सिंह लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिकाने सोशल मिडियावर पोस्ट करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली होती.तेव्हापासून चाहते उत्सुक आहेत.
अशात एक धक्कादायक बातमी समोर आल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे. दीपिकाच्या डिलिव्हरीला अवघे काही महीने शिल्लक असताना तिचा नवरा रणवीर सिंहने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
दीपिकाने लग्नाचे फोटो केले डिलिट?
रणवीरने चक्क सोशल मीडियावरून आपल्या लग्नाचे फोटो डिलिट केले आहेत. यामुळे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. यामुळे दीपिका आणि रणवीरच्या नात्यात काही बिनसलं आहे का, याची चर्चादेखील सुरू झाली आहे. त्यातच अजून एक धक्का म्हणजे रणवीरनंतर दीपिकानेदेखील आपल्या इन्स्टा अकाउंटवरून लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत.
रणवीरने आपल्या लग्नाचे फोटो डिलीट केल्यानंतर चाहत्यांनी दीपिकाच्या अकाउंटवरदेखील त्यांच्या लग्नाचे फोटो डिलीट झाले असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर चाहते आता वेगवेगळे अंदाज बांधत आहेत.
View this post on Instagram
रणवीर-दीपिका वेगळे होणार?
पण, खरं पाहायला गेलं तर दीपिकाने तीन वर्षांपूर्वीच आपल्या लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत. दीपिकाने 1 जानेवारी 2021 रोजी आपल्या सगळ्या पोस्ट हाइड केल्या आणि इन्स्टाग्रामवर नव्याने सुरुवात करत असल्याची हिंट दिली होती. यासोबत तिने चाहत्यांसाठी एक ऑडिओ मेसेज देखील शेअर केला होता.
त्यानंतर 11 महिन्यांनी दीपिकाने रणवीरसह आपल्या लग्नाचा फोटो पुन्हा रिस्टोअर केला होता. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपिकाने हा फोटो टाकला होता.त्यामुळे दीपिकाने फक्त लग्नाचेच नाही तर, 2022-2023 पूर्वीचेदेखील फोटो हटवले आहेत. पण, अलीकडील काळातील दोघांचेही फोटो त्यांच्या अकाउंटवर आहेत. त्यामुळे या सर्व चर्चा फोल ठरल्या आहेत. रणवीर गरोदर दीपिकाची काळजी घेत आहे. दोघेही आपलं सांसारिक आयुष्य आनंदी जगत आहेत. लवकरच त्यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
News Title- Ranveer Singh and Deepika Padukone relationship update
महत्वाच्या बातम्या-
मतदान झाल्यानंतर बारामती मतदारसंघात घडला धक्कादायक प्रकार, सगळीकडे एकच खळबळ
“एकनाथ शिंदेंना 2013 मध्येच शिवसेना संपवायची होती, 4 आमदारांसह…”; राजन विचारेंचा मोठा दावा
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोनं झालं स्वस्त?; नवीन किंमती आल्या समोर
‘शरद पवारांचा भाजपच्या बड्या नेत्याला फोन’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट
निवडणुकीच्या रणधुमाळीत पेट्रोल-डिझेलचे दर घसरले?; नवीन अपडेट समोर