“शाहरुखपेक्षा जास्त पैशांची ऑफर होती पण..”, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Actor Pawan Kalyan | देशात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला आजात आहे. बऱ्याच ठिकाणी कलाकार मंडळी देखील प्रचाराच्या मैदानात उतरली आहे. अशात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चर्चेत आला आहे.

अभिनेता पवन कल्याण सध्या लोकसभा निवडणुकीसाठी आंध्रप्रदेशमध्ये प्रचार करत आहे. नुकत्याच एका रॅलीदरम्यान त्याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलं आहे. त्याचं हे विधान वाऱ्यासारखं व्हायरल होत आहे.

“पैशांसाठी मी कधीच माझ्या मूल्यांशी तडजोड करत नाही”, पवन कल्याण (Actor Pawan Kalyan) म्हणाला आहे. यावेळी त्याने किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा देखील उल्लेख केला. एका जाहिराती संदर्भात पवन कल्याण याने वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाला अभिनेता?

पवन कल्याण याने प्रचार दरम्यान एक किस्सा सांगितला. 2000 मध्ये मला समजलं की एक सॉफ्ट ड्रिंक लोकांच्या आरोग्यासाठी ठीक नाही. या सॉफ्ट ड्रिंकमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, हे समजताच त्याची जाहिरात न करण्याचा निर्णय मी घेतला, असं अभिनेता म्हणाला.

“कोला ब्रँडने मला त्यांच्या सॉफ्ट ड्रिंकची जाहिरात करण्यासाठी ऑफर दिली होती. यासाठी ते मोठी किंमत मोजायला देखील तयार होते. मात्र मी त्यात जराही रस दाखवला नाही. मला शाहरुख खानपेक्षा जास्त पैशांची ऑफर मिळाली होती. पण मी माझ्या मूल्यांना अधिक महत्व दिलं.अशा पद्धतीने पैसे कमावण्यात मला अजिबात रस नाही”, असं पवन कल्याण (Actor Pawan Kalyan) म्हणाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pawan Kalyan (@pawankalyan)

दरम्यान,अभिनेता पवन कल्याणचा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठा चाहतावर्ग आहे. 2008 मध्ये त्याने राजकारणात प्रवेश केला. 2014 मध्ये त्याने जनसेना पार्टीची स्थापना केली. पवन कल्याण हा मेगास्टार चिरंजीवीचा लहान भाऊ असून भावाच्या पक्षासाठी चिरंजीवी यांनीसुद्धा जनतेला आवाहन केलं आहे.

News Title –  Actor Pawan Kalyan Says He Offered More Money Than Shah Rukh Khan for add 

महत्त्वाच्या बातम्या-

“एकनाथ शिंदेंना 2013 मध्येच शिवसेना संपवायची होती, 4 आमदारांसह…”; राजन विचारेंचा मोठा दावा

अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोनं झालं स्वस्त?; नवीन किंमती आल्या समोर

‘शरद पवारांचा भाजपच्या बड्या नेत्याला फोन’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

निवडणुकीच्या रणधुमाळीत पेट्रोल-डिझेलचे दर घसरले?; नवीन अपडेट समोर

पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार! ‘या’ दिवशी पावसाची शक्यता