‘आगामी काळात…’; शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठा दावा केला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत असताना त्यांनी एक वक्तव्य केलं. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पवार यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

काँग्रेस नेते पृथ्वीराज यांनी दोन पक्ष लोप पावण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विधानाने चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे.

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील

शरद पवार म्हणाले की, “येत्या 2 वर्षांमध्ये प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा त्यांच्याशी जवळीक करतील. काँग्रेस आणि त्यांच्या विचारधारेत तसा फारसा फरक नाही. आमच्या दोघांचीही विचारधारा ही गांधी-नेहरू यांच्या वाटचालीवर आहे.

उद्धव ठाकरे यांची विचारसरणी देखील आमच्या विचारसरणी सारखी आहे. ते देखील समविचारी पक्षासोबत काम करण्यासाठी सकारात्मक आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत.

याबाबत पक्षातील सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेससोबत आहोत. पुढील काळातील निर्णय किंवा रणनीती सामुहिकपणे विचार करून घेतले जातील. आम्हाला नरेंद्र मोदींसोबत जुळवून घेणं आणि पचवणे कठीण आहे ”

सपा, आरजेडी, बीआरएससारखे पक्ष स्थापन झालेत. त्यांच्या नेत्यांच्या मुलामलींपर्यंत कथित भ्रष्टाचार, घराणेशाहीचा आरोप होत आहे. एका व्यापकदृष्टीने सर्व एका छताखाली येत लढाई लढली जाईल, असं शरद पवार म्हणाले.

News Title – Sharad Pawar Statement About NCP Party Merge With Congress Party

महत्त्वाच्या बातम्या

आज औरंगाबाद-उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतरावर अंतिम फैसला होणार! निकालाकडे राज्याचं लक्ष

शेअर बाजारात घसरण; तरीही ‘हा’ शेयर तुम्हाला करणार लखपती

‘या’ तरुणाने केला मुख्यमंत्र्यांचा पाठलाग; नेमकं यामागचं कारण काय?

कोव्हीशील्ड लसी संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी समोर

वृषभ, कन्येसाहित ‘या’ राशींना बक्कळ पैसे कमावण्याची संधी