“महालात जाऊन गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक राहणं चांगलं”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mahadev Jankar | राज्यातील दुसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं. परभणीमध्ये महायुतीकडून महादेव जानकर (Mahadev Jankar) तर महाविकास आघाडीकडून संजय जाधव हे निवडणूक लढवत आहेत. अशात जानकरांनी (Mahadev Jankar) मोठं वक्तव्य केलं आहे. परभणीतून आपणच निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

“दुसऱ्याच्या महालात जाऊन गुलाम होण्यापेक्षा”

दुसऱ्याच्या महालात जाऊन गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक राहणं चांगलं. माझी विचारसरणी ही वेगळी असून ती धरूनच मी इतर पक्षांशी युती करतोय, असं  महायुतीचे परभणीतील उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी म्हटलं आहे.

अनेकजण म्हणत होते की कमळ चिन्हावर लढा. पण मी ठरवलं आहे आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं. मेलो तरी चालेल पण कमळ, हात, धनुष्यबाण बाण चिन्हावर लढणार नाही. मी पक्ष काढलेला आहे आणि माझ्याच पक्षावर मला आमदार-खासदार व्हायचं आहे. मी युती कुणाशीही करेण, असं जानकरांनी (Mahadev Jankar) सांगितलं.

Mahadev Jankar | “…तर मी पवारांना हरवलं असतं”

बारामती शहराने 2014 साली माझ्यावर आणखी जरा प्रेम केलं असत मी पवारांना हरवलं असतं. तेव्हा तर माझं चिन्हही लोकांपर्यंत पोहचल नव्हतं, वेळही मिळाला नव्हता, असं जानकरांनी म्हटलं.

बारामतीच्या निवडणुकीच्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं होतं की कमळावर लढ, पण मी त्याला नकार दिला होता असं महादेव जानकर म्हणाले. आता ही स्वतःच्या पक्षाच्या चिन्हवर मी दिल्लीत जाणार, असा विश्वास महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी व्यक्त केला.

दरम्यान, संजय जाधव गेल्या 10 वर्षांपासून परभणीचे खासदार आहेत. यामुळे जानकरांना जाधवांचं तगडं आव्हान असणार आहे. मात्र परभणीतून आपणच निवडून येणार असून मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीमधून 70 टक्के मतदान घेणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

सब पैसों का खेल है बाबू भैय्या! मुंबईत ऐन निवडणुकीच्या काळात 4 कोटी 70 लाख जप्त

शाॅरमा आवडीने खात असाल तर आत्ताच व्हा सावध; 19 वर्षीय तरुणाने गमावला जीव

‘आगामी काळात…’; शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

T20 World Cup बाबत रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी!

“शाहरुखपेक्षा जास्त पैशांची ऑफर होती पण..”, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या वक्तव्याने खळबळ