टी 20 विश्वचषकआधी पाकिस्तानातून धमकी; ‘त्या’ फोनने एकच खळबळ

T20 World Cup 2024

T20 Word Cup 2024 | टी 20 विश्वचषक 2024 (T20 Word Cup 2024) वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशांमध्ये होणार आहे. हा विश्वचषक येत्या 2 जून रोजी होणार आहे. याकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. मात्र या विश्वचषकाकडे काही आतंकवाद्यांचंही लक्ष लागलं आहे. यामुळे हा विश्वचषक देशासाठी प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंसाठी धोक्याची घंटा आहे. पाकिस्तानातून ही धमकी आल्याची माहिती समोर आली आहे.

धमकीचे फोन आल्यानंतर वेस्ट इंडिजने सावध पावलं उचलली. यामुळे सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे. यासाठी वेस्ट इंडिजने सुरक्षेची पाऊलं उचलली आहेत. पाकिस्तानमधील आयएस-खोरासानकडून टी 20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं जगभरातील मोठ्या कार्यक्रमात हल्ला घडवणार असल्याची धमकी दिली आहे.

प्रशासन अलर्ट मोडवर

दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट झालं आहे. प्रत्येक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यमांनुसार, स्पोर्टिंग इव्हेंटदरम्यान हिंसाचार घडवण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. अफगानिस्तान-पाकिस्तान ब्राँचमधील व्हिडीओ समोर आला आहे.

काय म्हणाले वेस्ट इंडिजचे बोर्डाचे सीइओ

टी 20 विश्वचषकात (T20 Word Cup 2024) वेस्ट इंडिजमध्ये सुरक्षा तैनात करण्यात येणार असल्याचं ठोस पाऊल वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. वेस्ट इंडिज बोर्डाचे सीइओ जॉनी ग्रेव्स यांनी क्रिकबज यांना सांगितलं, आम्ही ग्लोबल लँडस्केपच्या निगरानीखाली हे सर्व सुरक्षा करण्यात येणार आहे.

2007 पासून टी 20 विश्वचषकाला (T20 Word Cup 2024) सुरूवात झाली. आतापर्यंत सर्वात मोठी स्पर्धा म्हणून टी 20 विश्वचषक 2024 कडे पाहिलं जाणार आहे. कारण यंदाच्या टी 20 विश्वचषकात (T20 Word Cup 2024) सर्वाधिक 20 संघ खेळले जाणार आहेत. यामुळे सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे.

याकडे केवळ भारतचं नाहीतर अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. मात्र या विश्वचषकात दहशतवाद्याचं सावट असून सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली होती. आता त्यामध्ये आणखी भर पडली आहे.

News Title – T20 World Cup 2024 Terrorist Attack Cricket News

महत्त्वाच्या बातम्या

शाॅरमा आवडीने खात असाल तर आत्ताच व्हा सावध; 19 वर्षीय तरुणाने गमावला जीव

‘आगामी काळात…’; शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

T20 World Cup बाबत रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी!

“शाहरुखपेक्षा जास्त पैशांची ऑफर होती पण..”, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या वक्तव्याने खळबळ

प्रेग्नंट दीपिका अन् रणवीरच्या संसारात वादळ?, घेतला मोठा निर्णय

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .