“तेच आदित्य ठाकरे ज्यांच्या ज्यूस आणि नाश्त्याची सोय श्रीकांत शिंदे करायचे”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sushma Andhare | राज्यात लोकसभा निवडणूक सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा नुकताच पार पडला. जिकडे तिकडे प्रचारासाठी सभा, रॅली काढली जातेय. आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. तर आव्हान-प्रतिआव्हान केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर कोण आदित्य ठाकरे?, असा सवाल केला आहे. त्यावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जशासं तसं प्रत्युत्तर दिलंय.

अंधारेंचा मुख्यमंत्र्यांना इट का जवाब पत्थरसे

“लोकसभेच्या प्रचारसभेसाठी मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलं. ते लोकसभेसाठी होतं की ग्रामपंचायतीसाठी होतं हे कळायला मार्ग नाही. मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे कोण? असा प्रश्न केला. आदित्य तेच ज्यांना श्रीकांत शिंदे ज्यूस आणि नाश्त्याची सोय करताना दिसत होते”, असं म्हणत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एकनाथ शिंदे यांना इट का जवाब पत्थरसे दिला.

उस्मानाबाद आणि औरंगाबाद नामांतरावर भाष्य

उस्मानाबाद आणि औरंगाबाद नामांतरावर आज निर्णय घेण्यात आला. त्यावर अंधारे यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, “नामांतराचा निर्णय हा कोणी घेतला हे माहिती आहे. आपण फक्त आपली नौटंकी करायची.

न्यायाधिशांनी सांगितलं आहे की आमच्यावर दबाव आहे. उद्धवसाहेबांनी नामांतराचा निर्णय हा अधिच घेतला होता. श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे”, असं अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्यात.

शरद पवार यांच्या विधानावरून सुतावरून स्वर्ग गाठू नये. त्यांच्या बोलण्यातून येणारे अर्थ भल्या भल्यांना लागत नाहीत. विकासावर ज्यांना बोलता येत नाही ते हिंदु मुस्लिम करू लागले आहेत. आधी ओवैसी तार्किक बोलायचे आता तेही काहीही बोलू लागले आहेत, असं अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या आहेत. मतदानाचा टक्का कमी होत आहे, त्याला शिंदे,-फडणवीस अजित पवार यांची दादागिरी जबाबदार आहे, असं त्यांनी म्हटलंय.

शहिदांचा अपमान करणारी काँग्रेस असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे त्याची तक्रार करावी. औरंग्याची कबर उद्धव ठाकरे यांनी खोलली असल्याचं ते म्हणाले. जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होणारं हे वक्तव्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, असं अंधारे म्हणाल्या आहेत.

News Title – Sushma Andhare Replied To Eknath Shinde About Aditya Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

कंगना म्हणते ‘बिग बी नंतर मलाच जास्त मान’, प्रसिद्ध अभिनेत्याला हसू आवरेना

महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मान्सून दाखल होणार, पंजाब डख यांचा अंदाज

‘…तर मी मिशा ठेवणार नाही’; गुणरत्न सदावर्तेंनी दिलं आदित्य ठाकरेंना चॅलेंज

राज्यात 10 हजार कोटी रुपयांचा ॲम्बुलन्स घोटाळा?, हायकोर्टानं मागितला शिंदे सरकारकडं खुलासा

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला उघडणार केदारनाथ धामचे द्वार