‘दीपिका प्रेग्नंट आहे तरी बेबी बंप का दिसेना?’; चाहत्यांना सतावतेय चिंता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Deepika Padukone | अभिनेत्री दीपिका-रणवीर हे अनेकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. दीपिका आणि रणवीरने प्रेग्नंसीबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिला सध्या पाचवा महिना सुरू असल्याच्या चर्चा आहेत. मात्र तिचं पोट का दिसत नाही. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी याबाबत सोशल मीडियाद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Deepika Padukone)

दीपिकाचं बेबी बंप दिसत नाही, व्हिडीओ व्हायरल

दीपिका आणि रणवीर सुट्ट्यांचा मनमुरादपणे आनंद लुटताना दिसत आहेत. बुधवारी ते पुन्हा व्हेकेशनवरून परतले आहेत. यावेळी दीपिकाने को-ऑर्ड सेट परिधान केला आहे. ती नेहमी सैल कपडे घालताना दिसत असते. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यास त्यामध्ये दीपिका प्रेग्नंट दिसत नाही.  (Deepika Padukone)

 

View this post on Instagram

 

A post shared by deepika padukone FC (@deepikafpc)

नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया

दीपिका (Deepika Padukone) जर प्रेग्नंट आहे तर ती स्वत:ची काळजी का घेत नाही, असा एकाने सवाल केला आहे. तर काहींनी सरोगसी पद्धतीने प्रेग्नंट राहण्याची शक्यता वर्तवली आहे. जसे की अभिनेत्री प्रियंका चोप्राने ज्यापद्धतीने सरोगसी पद्धतीने आई झाली होती. आता दीपिका देखील असंच काहीसं करत असल्याचा दावा नेटकऱ्यांकडून कमेंट्सच्या माध्यमातून केला जात आहे. (Deepika Padukone)

गेल्या काही दिवसांआधी रणवीर आणि दीपिकाने आपल्या सोशल मीडियावर लग्नाचे फोटो डिलीट केले होते. त्यामुळे दीपिका आणि रणवीरच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. या चर्चांना घेऊन दोघांकडून प्रतिक्रिया आली की 2023 च्या आधीचे पोस्ट डिलिट करण्यात आले. त्यामुळे लग्नाचे देखील पोस्ट डिलिट करण्यात आले आहेत.

कॉफी विथ करण या कार्यक्रमात बोलत असताना दोघांनी सर्व सामान्यांप्रमाणे आमच्यातही खटके उडाले होते. लग्न म्हणजे नुसतं उठून चहा कॉफी बनवून देणं नाही, हे खोटं आहे. मात्र काही दिवस असेही असतील. लग्न म्हणजे काम आणि कामच लग्नाला सुंदर बनवते, असं सांगितलं होतं.

इटलीतील लेक कोमो येथे 2018 मध्ये दीपिका आणि रणवीरचा विवाह सोहळा पार पडला. 2015 या वर्षात दीपिका आणि रणवीरने गुपचुप साखरपुडा उरकल्याचा खुलासा कॉफी विथ करणमध्ये केला होता.

News Title – Deepika Padukone Pregnancy Questioned Netizens Are Guessing Surrogasy Delevery

महत्त्वाच्या बातम्या

“केएल राहुल शांत का राहिला?, त्यानं मालकाचं तोंड हाणायला पाहिजे होतं”

नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल; उद्धव ठाकरे कोणावर भडकले?

शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! तब्बल ‘इतक्या’ दिवस अवकाळी पावसाचा इशारा

चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य ठरलं बारामतीत कमी मतदान पडण्याला कारणीभूत

पुण्याच्या निवडणुकीत मिठाचा खडा; निवडणुका आयोगाने उमेदवारांना पाठवल्या धडाधड नोटिसा