“केएल राहुल शांत का राहिला?, त्यानं मालकाचं तोंड हाणायला पाहिजे होतं”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

KL Rahul | सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्सवर आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 57 व्या सामन्यात 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादने हे आव्हान 9.4 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं.

ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने धुव्वादार बॅटिंग करत हैदराबादला 10 ओव्हरच्या आतच विजय मिळवून दिला. या दोघांनी लखनऊच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. हैदराबादला या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झालाय. तसेच हैदराबादने प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवलंय.

लखनऊने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अडखळत झालेल्या सुरुवातीमुळे लखनऊची 4 बाद 66 अशी स्थिती झालेली. मात्र त्यानंतर निकोलस पूरन आणि आयुष बदोनी या जोडीने पाचव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. त्यामुळे लखनऊला 4 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 165 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र एलएसजीचा पराभव झाला.

पराभवानंतर केएल राहुलला झापलं

या सामन्यानंतर कर्णधार के. एल. राहुल (KL Rahul) याला जे सहन करावं लागलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. पराभवानंतर एलएसजीचे मालक डॉ. संजीव गोयंका यांनी मैदानावरच के एल राहुलची (KL Rahul) सर्वांसमोरच शाळा घेतली. संजीव गोयंका हा लाजिरवाणा पराभव पचवू शकले नाहीत.

“मालकाचं तोंड हाणायला पाहिजे होतं”

मैदानावर सर्वांसमोर के एल राहुलला (KL Rahul) सुनावनं हे चाहत्यांना मात्र रूचलं नाही. सोशल मीडियावर केएल राहुल आणि भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांनी संजीव गोयंका यांना चांगलंच झापलं आहे. केएल राहुल शांत का राहिला?, त्यानं मालकाचं तोंड हाणायला पाहिजे होतं, असं काही चाहत्यांनी म्हटलंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.

एलएसजीचे मालक आणि कर्णधार केएल राहुल (KL Rahul) यांच्यात काय संभाषण झालं हे कोणालाही ठाऊक नसलं तरी राहुलसोबत त्यांचं वागणं पाहता लखनऊच्या खराब कामगिरीचा सर्व राग त्यांनी केएलवर काढला हे स्पष्ट दिसतंय.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल; उद्धव ठाकरे कोणावर भडकले?

शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! तब्बल ‘इतक्या’ दिवस अवकाळी पावसाचा इशारा

चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य ठरलं बारामतीत कमी मतदान पडण्याला कारणीभूत

पुण्याच्या निवडणुकीत मिठाचा खडा; निवडणुका आयोगाने उमेदवारांना पाठवल्या धडाधड नोटिसा

या राशीच्या व्यक्तींना मित्रमंडळींच्या मदतीने उत्पन्नाच्या संधी मिळतील