मिनी फोल्डिंग ई-बाईक, किंमत फक्त… किंमत ऐकून चकीत व्हाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Yadea UFO S | चायना इंटरनॅशनल बाइक फेअर हा जगातील सर्वात मोठा बाईक शो असून याच शोमध्ये Yadea UFO S ही ई-बाईक प्रदर्शित करण्यात आली. UFO S ई-बाइक एक लहान फॉर्मेट वर्सिटाइल फोल्डिंग ई-बाइक आहे. याची डिजाइन Yadea UFO सोबत अगदीच जुळते.

किंमत काय?

Yadea UFO S फोल्डिंग ई-बाइक ची किंमत जवळपास 2,500 युआन ($346) पेक्षा कमी असेल. म्हणजेच भारतीय किंमतीमध्ये ती तुम्हाला अंदाजे 29,446.13 रुपयांमध्ये पडेल. Yadea या इलेक्ट्रिक बाइक ला लवकरच लॉन्च करणार असून यानंतर ती विदेशी बाजारात लॉन्च होईल.

ही बाईक रियर हब मोटरशी सुसज्ज असून ती जास्तीत जास्त 420W आणि 250W चे आउटपुट प्रदान करते. या ई-बाइकला 14 x 2.125 इंचचे टायर्स बसवण्यात आले आहेत. ज्यांना कॉम्पॅक्ट, फोल्डिंग ई-बाईकची गरज आहे अशा शहरातील प्रवाशांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. या बाईकला बस किंवा ट्रेनमध्ये सहजपणे ठेवता येते आणि पेडल-राईडसाठी देखील वापरले जाऊ शकते.

Yadea UFO S ची जबरदस्त स्पीड

Yadea UFO S 17 बाइकची कमाल स्पीड 25 किमी प्रति तास असून ती अनेक युरोपियन आणि आशियाई बाजारपेठांमध्ये मर्यादेत येते. ई-स्कूटर आणि ई-बाइक सेगमेंटमध्ये Yadea जागतिक बाजारपेठेत अव्वल आहे, तिच्या आगामी Yadea UFO S बाईकबद्दल अधिक माहिती लवकरच समोर येऊ शकते.

News Title – Yadea UFO S Mini folding e-bike

महत्त्वाच्या बातम्या-

“शरद पवारांचा मुलगा नसल्याने मला..”; अजित पवारांच्या मनातली सल अखेर उघड

“एकनाथ शिंदे कोण आहेस तू?”; प्रियंका चतुर्वेदी भरसभेत भडकल्या

अजित पवारांनी खडसावलं, चंद्रकांत पाटलांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही!

दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

पुणे हादरलं! पानटपरीवर घडला धक्कादायक प्रकार