दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Indian Navy Recruitment l भारतीय नौदलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलाने अग्निवीर योजनेंतर्गत SSR आणि MR च्या भरतीसाठी अधिसूचना जारी करून भरती जाहीर केली आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर भारतीय नौदलाने अर्जाच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

या तारखेपर्यंत करता येणार अर्ज :

या भरतीमध्ये MR पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच SSR पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने गणित, भौतिकशास्त्र आणि संगणक विज्ञान/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र या विषयात इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराचा जन्म 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 या दरम्यान असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी पात्रता इच्छुक उमेदवार 27 मे 2024 पर्यंत फॉर्म भरू शकतील. भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर जाऊन फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरला करायचा आहे.

Indian Navy Recruitment l अशाप्रकारे भरा ऑनलाईन अर्ज :

– या भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल.
– यानंतर तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर लॉगिनद्वारे इतर तपशील भरून फॉर्म पूर्ण करावा लागेल.
– यानंतर विहित शुल्क जमा केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यावी लागेल आणि ती सुरक्षित ठेवावी लागेल.

या भरती प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज शुल्क भरावी लागणार आहे. यामध्ये सर्व श्रेणीतील उमेदवारांना अर्जासाठी 550 रुपये शुल्क भरावे लागतील. तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्जाची फी जमा करावी लागणार आहे.

News Title – Indian Navy Recruitment 2024 

महत्त्वाच्या बातम्या-

कर्जवाटपासंदर्भात आरबीआयने नियम बदलले; जाणून घ्या नवीन नियम

तुमच्या मुलीच्या लग्नासाठी महिन्याला 1000 रुपये गुंतवा; लग्नाचा खर्च आरामात निघेल

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कमी किंमतीत खरेदी करा ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाचं निधन; संपूर्ण बॉलीवुडमध्ये शोककळा

“केएल राहुल शांत का राहिला?, त्यानं मालकाचं तोंड हाणायला पाहिजे होतं”